Wednesday, September 25, 2013

लता मंगेशकर यांची हिंदी गाणी

मित्र हो,

रविवारी शिबिरात अपर्णा गोरेने`एक सीडी दिली. बहुतेक सर्वांना ती मिळाली असावी.  त्या सीडीत लताची १६० हिंदी गाणी आहेत. ही सर्व गाणी ऐकून झाली नाहीत पण ५०/६० गाणी ऐकली ती अफलातून आहेत.  
म्हणजे हा सर्व संग्रहच एकाहून एक सरस गाण्यांचा आहे. 
यातले एक एक गाणे म्हणजे दागिना आहे. लताबाईच्या आवाजातील 'जीवघेणी कोवळीक' (इति गोविंद तळवलकर ) ठायी ठायी अनुभवता येते. ह्या गाण्यांचा मनमुराद आनंद घ्या. 

एक नम्र सूचना -
संगणक किंवा मोबाईल वर ऎकत असाल तर random mode ठेऊन ऐका नाहीतर क्रमाने पहिली १५/२० गाणी झाल्यावर आपली गाणी ऐकण्याची उसंत संपते आणि दरवेळी तीच तीच गाणी (पहिली १५ /२०) ऐकली जातात.
सर्वात चांगला उपाय हा की आपल्या आवडीनुसार २०/२० गाण्याचे फोल्डर ( किंवा सिडीज ) करा व ते वारंवार ऐका.  कारण ह्यातील बहुतेक गाणी कितीहीवेळा ऐकली तरी त्यातून मिळणारा आनन्द कमी होणार नाही. म्हणूनच तर लताच्या गाण्याला कोणीसे अक्षय गाणे म्हटले आहे.
 
लताआजींनी हा कधीही न संपणारा आनंदाचा ठेवा आपल्या हाती दिला आहे.
दोन्हीं 'लता' बाईना मनापासून धन्यवाद !!!!
विकास