Monday, April 21, 2014



Hello,
काल रात्री मला  एक स्वप्न पड़ल. पण काय ते मी  आता विसरले. पण सकाळी उठले  तेव्हा त्या स्वप्नामुळे मला ही कविता सुचली





एक छोटीशी परी
उंच उंच पर्वत त्यात खोल दरी,
त्यात उभी होती एक छोटीशी परी
तयार होती मारायला उडी,
या सुंदर जगात कायमची घ्यायला दडी
परी आली होती आईबाबांच्याच बरोबर
पुरामुळे उध्वस्त झाले होते घरदार
पण या परीत लपले होते एक प्रेमळ भूत
कोणावरही निस्वार्थ प्रेम करणारे,
त्या दरीत उरले होते एकच हिरवेगार झाड
परी रडू लागली, हट्ट करू लागली
आईबाबा होते स्वतःच्याच विचारात
दुष्ट जगामुळे आत्महत्या करण्यात
परीला शेवटी एकदाच बघायचे होते ते झाड
आईबाबांना खेचत घेउन गेली परी
ते तिघे उभे राहिले झाडाखाली
तितक्यात डोक्यावर फुले पडली बहाव्याची
जगाकडून ओथंबून मिळणारे प्रेम वेगळ्याच रूपात दिसले
आत्महत्या करणे मनातून कुठच्या कुठे पळून गेले


-मल्लिका चौकर

Saturday, April 12, 2014

लताआजीच्या वतीने 



तात्पर्य
नुकतीच मी एक गोष्ट वाचली.
एक तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस होता. चांगला शिकलासवरलेला, सधन असा, यथावकाश त्यानं घर घेतलं. त्याच्यापरीनं त्यानं ते छान सजवलं. बायकोमुलांसोबत तो तिथं निवांतपणे राहू लागला. एकदा बायको म्हणाली, ``घरात उंदीर आलायसं वाटतं.’’ माणूस म्हणाला, ``पिंजरा आण.’’
पिंजऱयात उंदीर येईनात. बायकोची तक्रार वाढतच गेली. कारण उंदराचा धुडगूस वाढतच होता. माणूस स्वत:तच दंग होता. उंदरांचा त्रास त्याला जाणवतच नव्हता. कारण त्याचे कपडे, महत्त्वाचे कागदपत्र, चाव्या, घड्याळ असं सारं बायको सांभाळून ठेवत होती. नाही म्हणायला एकदा टीव्हीची वायर उंदरानं कुरतडली तेव्हा त्याला प्रश्नाची निकड समजली असती. पण दुपारी सीरियल पाह्यला म्हणून टीव्ही लावू जाताच बायकोच्या ते लक्षात आलं. आपली रात्रीचीही सीरियल बुडायला नको, म्हणून तिनं ताबडतोब टिव्ही दुरुस्त करून घेतला.
उंदरांचा उच्छाद वाढता वाढता एकदा एवढा वाढला की, बायकोची भुणभुण आता भांडण, आक्रस्ताळेपणा वगैरेच्या पातळीवर गेली. माणसाला वाटलं, हे घर माझं, तिथं उंदरांची अशी दादागिरी कशी चालवून घेणार? घर माझं की उंदरांचं?’’
त्यानं मग एक मांजर आणलं. तिचं गोजिरवाणं रुपडं त्याला भावलं. तीही आल्या आल्याच मालकाच्या पायांशी घोटाळू लागली. त्याच्या पायांशी अंग घासू लागली. बघता बघता तिनं घरात सगळ्यांना आपलंसं केलं. अधून मधून दूध फस्त करण्याच्या लुच्चेपणाबद्दल बायको तिला लटकं रागावलीही. हे तेव्हा क्वचितच घडत होतं. मांजर उंदीर खाऊन धष्टपुष्ट झाली. घरात माणूस पुन्हा ऐटीत राहू लागला.
आता घर आपलं आणि मांजराचंही आहे हे त्यानं खुषीत स्वीकारलं. पण काही दिवसांनी पुन्हा एकदा बायको म्हणाली, उंदीर येतोसं वाटतं आताशा घरात रात्रीचा.’’ दिवसभर मांजर घरात सोफ्यावर मजेत झोपा काढायची आणि रात्री हिंडायला बाहेर पडायची, ती थेट सकाळी दूधवाल्याला दार उघडलं की घरात शिरायची. वरचेवर तिची पिलावळ घरात वावरताना माणसाला दिसायची. अधूनमधून खिडकीतून डोकावणारा बोकाही संधी साधून घरात येऊ लागला. बायको पार कावून गेली. नवराबायकोत वाद, भांडणं याच कारणानं सुरू राहिली. माणसाला वाटत राह्यलं, की त्याचं घर उंदीर, मांजरांपासून वाचवणं ही एकट्या बायकोची जबाबदारी आहे. हाच धोशा तो लावत राहिला. भांडणं वाढली. अगदी विकोपाला गेली तसतशी घरातली उंदीर-मांजरांची सत्ताही वाढतच गेली.
एक दिवस माणूस वैतागला. त्याला वाटलं, आधी घर माझं होतं. माझ्या बायकोमुलाचं होतं.
मग ते आमचं आणि उंदरांचं झालं.
कालांतराने ते उंदरांचं आणि आमचं झालं.
पुढे ते आमचं आणि मनीमाऊंचं झालं.
कालांतरानं तेही चित्र बदललं.
घर उंदरांचं, मांजरांचं आणि आमचं झालं.
आणि आज...
घर फक्त त्यांनाच राह्यलंय.
मी बेघर झाल्यात जमा आहे.
गोष्ट वाचून मला वाटलं, हा माणूस स्वतला शहाणा समजत होता. उंदरांवर मांजर हे औषध आहे, एवढंच त्याला पुस्तकातल्या गोष्टी वाचून बालवयात ठाऊक झालं होतं. बालवयातील त्या पुस्तकी ज्ञानावर तो संतुष्ट राहिला. या उच्छादावर पर्याय निवडायला त्याला त्रास पडला नाही. कारण त्याला एकच पर्याय ठाऊक होता. तेव्हा खरोखरच परिस्थितीवर उपाय म्हणून एकच पर्याय उपलब्ध होता की आणखीही पर्याय उपलब्ध होते, याबाबत विचार करायची तसदी त्यानं घेतली नाही, हे खरं!  परिणामी तो स्वत:चं घर असून बेघर झाला. त्याच्यापाशी तर फेसबुक, व्हॉटस्अॅप यांसारखी साधनं होती. त्यावर त्याला लाइक करणाऱया मित्रमंडळींनी अनेक पर्याय पुरवलेही असते. ते पर्याय कदाचित सगळेच हलकेफुलके, निरुपयोगी असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे खरं. पण तरीही कुणीतरी एखादा नेमका पर्याय सुचवलाही असता.
माणसानं ते माध्यम नीट वापरलं असतं तर त्यातून सापडलेल्या उत्तरांवर विचार करता करता, कदाचित त्याला स्वत:लाच एखादा योग्य पर्याय सापडला असता.
साऱया जगण्याचंच सुलभीकरण करता करता झटपट, सोपा पर्याय निवडायची सवय लागलेल्या या माणसाचं दुसरं काय होणार? मला या गोष्टीतून सापडलेलं हे इसापचं एक तात्पर्य आणि घरातील उंदीर घालवायला मांजराला घरात आणणं ही घोडचूक होते, हे दुसरं तात्पर्य.