Sunday, November 25, 2012

मातृभूमी परीचय शिबीर 
              स्वामी विवेकानंद गुरुकुल या शाळेतून दरवर्षी दिवाळी नंतर आमचे एक शिबीर असते. आत्तापर्यंत रायगड, दापोली, कराड , बदलापूर ,  कोचबाड इ. ठिकाणी गेलो होतो.  ह्या वर्षीसुद्धा शिबीर नाशिकला  होते. सहलीला ज्या दिवशी जाणार होतो त्या दिवशीच्या आदल्या दिवशी आम्हाला सूचना देण्यात आल्या. 
               १७ तारखेच्या दुपारी १:०० वाजेपर्यंत दादर टर्मिनसला पोचलो.पोचल्यावर आम्ही तेथे एक पाऊणतास टाईमपास केला. आणि २:००वाजताची गाडी पकडायची म्हणून मेन स्टेशनवर गेलो.आमच्या गाडीचे नाव जनशताब्दी एक्स्प्रेस(१२०७१) हे होते. आमची गाडी दादर ते औरंगाबाद होती. त्या गाडीत आम्ही फटाफट चढलो.आम्ही आमच्या साठी सीट पकडल्या. आणि सुटकेचा श्वास सोडला. आणि आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली . ह्या गप्पा नाशिकपर्यंत चालू होत्या. आम्ही emergancy window तून सामान धपाधप बाहेर टाकले कारण गाडी अगदी थोडावेळ थांबणार होती. आमच्यासाठी ज्या दोन बस बुक केल्या होत्या त्या बसमद्ध्ये बसलो आणि मुक्कामाच्या ठिकाणी (पिंपळद) निघालो वाटेत आम्ही कुठेच थांबलो नाही. आम्हाला पोचायलाच ९ वाजले होते. आम्ही लगेच जेवायला गेलो. त्या दिवशी रोजच्यासारखेच जेवण होते. तेच पदार्थ आम्हाला खावे लागले. त्याला कणभर सुद्धा चव नव्हती. तरीपण आम्ही तसेच खाल्ले. आम्ही नंतर आमच्या रूमवर गेलो. आणि लगेच आम्ही झोपी गेलो. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर म्हणजेच ६:३० वाजता उठायचे होते.
               १८ तारखेला सकाळी आम्ही ६:३० वाजता उठलो. उठून प्रातर्विधी आटोपले. नंतर आम्ही धावण्यासाठी गेलो. धावल्यानंतर आम्ही exercise केले. आणि डोंगर चढलो. नंतर आम्ही न्याहारी केला. हाच कार्यक्रम रोज सकाळी असायचा. आम्ही नंतर पोहायला गेलो. तिकडचे पाणी हे बर्फासारखे थंड होते. पाणी फक्त कंबरे एवढेच होते त्यामुळे मला तरी नीट पोहता आले नाही. साधारणत: पूर्ण दिवस खेळखेळ खेळलो.रात्री थकून लवकर झोपलो.  
               १९ तारखेला आम्ही प्रथम पोहायला गेलो. नंतर लगेच गावाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलो.गावाचे सर्वेक्षण म्हणजे आरोग्याच्या सुविधा,स्वछतेच्या सोयी, सेती, पिकांची माहिती, पानिपुरवठ्याची पद्धत, सांडपाण्याची सोय या विषयींची माहिती आम्ही मिळवली. नंतर आम्ही त्याच्या संबंधी चर्चा केली आणि या तीन दिवसांचा अहवाल लिहिला.जेवण झाल्यावर आम्ही झोपलो. 
               २० तारखेला आम्ही ब्रम्ह्गीरीला  गेलो होतो. तेथे एकूण ७०० पायऱ्या आहेत. त्या चढायच्या होत्या. काही जण खालतीच थांबले आणि आम्ही वर गेलो. चढताना आम्हाला एक साप दिसला. पण तो  सूर्याच्या दिशेला असल्यामुळे मला तो कोणता साप आहे हे ओळखता आले नाही. पण मी तो साप बघून एवढच सांगू शकतो कि "तो साप बिनविषारी होता. " नंतर आमच्यातल्या काही मुलामुलींना माकडांशी सामना करावा लागला. त्यातूनच त्यांनी वाट काढली आणि परत आमच्या मागे आले. मग आम्ही दुपारी वर पोचलो. लगेच आम्ही देवळांना भेट दिली. ब्रम्ह्गीरी हे उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. हे समुद्रसपाटीपासून ३००० फुट उंचीवर आहे. मग आम्ही खाली उतरलो. चढायला आम्हाला २:३० तास लागले आणि उतरायला फक्त ४५ मिनिटे !!! 
        २१ ला आम्ही  नाशिक दर्शन केले. त्यात (1) गारगोटी म्युझिअम  - नाशिकपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे.येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले वेगवेगळे  दगड आहेत. जास्तीकरून जळगाव, पुणे येथून आणलेले दगड आहेत. आणि आश्चर्य करणारी एक गोष्ट म्हणजे काळोखात चकाकणारे दगड. (२) मुक्तिधाम- मुक्तिधाम येथे अनेक देव आहेत. जे देव अख्या भारतात प्रसिद्ध आहेत असेच देव इथे आहेत. उदा. गणपती, शंकर. 
        २२  ला आम्ही नाशिक दर्शन केले. त्यात (1) गंगापूर धरण-संपूर्ण नाशिक शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यातून होतो.पण येथे साकारणाऱ्या प्रकल्पामुळे विविध माध्यमातून पाण्याचे प्रदूषण होते.गंगापूर धरण पाहताना आम्हाला एक समुद्र सर्प दिसला. तो एक मासा खात होता. तो मासा खाण्यासाठी किनाऱ्यावर आला होता. (२)  नाण्यांचे सेंटर - येथे वेगवेगळ्या नाण्यांचे प्रकार ठेवलेले आहेत. हि नाणी वेगवेगळ्या देशांतून आणलेली आहेत. (३) भगूर - स्वातंत्र्यवीर तात्या साहेब सावरकर यांचे जन्मस्थान नाशिकपासून जवळ असलेल्या भगूर या ठिकाणी आहे. (४) कुसुमाग्रज प्रतिष्ठान- न्यानपीठ पुरस्कार विजेते व कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ.  (५) पांडव लेणी - या लेण्यांना त्रीर्ष्मी लेणी असे म्हणतात. सुमारे इ.स. १२०० च्या  दरम्यान हि लेणी खोदली गेली आहेत . या लेण्यांवर स्त्रियांचे अलंकार, वस्त्रे कोरलेली आहेत. यात अनेक गुहा आहेत. या लेण्यांमध्ये त्या काळी बुद्धांचे अनुयायी तपश्चर्या करायला बसायचे.
आणि त्याच रात्री आम्हाला डुरक्या घोणस दिसला. 
        २३ तारखेला सकाळी ७:३० वाजता निघालो आणि नाशिक स्टेशनला पोचलो. ट्रेन ८:५५ ची होती. आम्ही गाडीत खूप खादाडी केली. आणि दुपारी ठीक १२:३० वाजता दादर स्टेशनवर पोचलो. त्या वेळीस आमच्या गाडीचा नंबर १२०७२ असा होता.              
              एकूण आमचे शिबीर चांगले पार पडले. पण वेगवेगळे साप पाहिल्यामुळे मला अधिकच आनंद झाला . 
    उन्मेष परांजपे 

No comments:

Post a Comment