Monday, July 16, 2012


माझा अनुभव
मी शाळेत असताना Tution  ला एका बाईंकडे ( श्रीमती ऐनापुरे) जात असे. काही वर्षांनी बाई त्यांच्या Family Problem मुळे अचानक डोंबिवलीसोडून पुण्याजवळ निगडी ला स्थायिक झाल्या.
बरेच वर्ष मला बाईंना भेटायची फार इच्छा होती पण पत्ता मिळत नव्हता. बरेच प्रयत्न करून तो मिळवला आणि काही महीन्यांपूर्वी मी, चिन्मय केदार बाईंना भेटायला गेले.
सुरूवातीला चिन्मय बराच सा होता की तिकडे जा काय करणार, काय बोलणार? पण आम्ही त्यांच्याकडे जो तास दीड तास होतो त्यात त्यांनी अति आपुलकीने आणि मन मोकळया गप्पा मारल्या. विशे म्हणजे चिन्मयही ळूळू मोकळा श्वस्त झाला.
एवढया वर्षांनी मी मुद्दामून भेटायला गेल्यामुळे बाईंना वाटलेले समाधान , जिव्हाळा त्यांच्या चेहेयावर, बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. या भेटीमुळे लाही खूप आनंद झाला एका अत्यंत चांगल्या प्रेमळ व्यक्ती चिन्मय केदारची भेट झाल्या मुळे खूप बरे वाटले.
 त्या वेळी जाणवले की आपल्या नकळत चांगल्या माणसांचे आपल्यावर लहानपणी किती चांगले संस्कार होत असतात.

मृदुला

Saturday, July 14, 2012


लोकसत्ता दिनांक ७ जुलै २०१२च्या वास्तुरंग पुरवणी मध्ये एकलेख होता ‘उध्वस्त स्टुडिओची कहाणी’. त्यात लेखिकेने (साधना बहुळकर) चित्रकार माधव सातवळेकर यांच्या बद्दल आणि त्यांच्या चित्रशैली बद्दल लेख लिहिला होता. लेख वाचताना आणि त्यातील चित्रे पाहून एकदम शिबिराची आठवण झाली. एकदा शिबिरात, विकास परांजपेनी चित्रकार माधव सातवळेकर आणि त्यांच्या चित्रशैली बद्दल माहीती सांगितली होती आणि त्यांची बरीच चित्रे आम्हाला दिली होती. लेखानिमित्ताने त्या चित्रांची आठवण झाली आणि सर्व चित्रे मी मुलांबरोबर परत पाहीली. माधव सातवळेकरांची खास शैलीअसलेली निळी रेषा (signature style) प्रत्येक चित्रात  उठून दिसत होती, मग ती निसर्गरम्य चित्रे असोत, व्यक्ती स्वरूप चित्रे किंवा वर्णन चित्रे असोत. माधव सातवळेकरांची इतकी सुरेख चित्रे आम्हाला दिल्या बद्दल विकास परांजपेचे आभार. सर्व चित्रे बघून, परत परत बघून आम्हाला खूप मजा आली.

जयश्री

ek chhotishi sutti

    शिवानी आणि वैष्णवीच्या  शाळेला  गुरुवारी सुट्टी असते .मी देखील गुरुवारची रजा घेतली आणि बुधवारी संध्याकाळी अलिबागला आमच्या गावी गेलो .प्रवासात सगळीकडे हिरव्या रंगाच्या विविध छटा बघायला मिळाल्या .पेण नंतर  हिरवी शेते  दिसू लागली .सध्या भाताची लावणी सुरु आहे .
                 खूप दिवसांपासून लांबणीवर पडलेली माझ्या मामांची भेट घेतली .त्यानाही खूप बरं  वाटलं .माझ्या लहानपणीच्या आठवणी गमतीजमती मुलींबरोबर share  केल्या .तिथून आमच्या घरी जायला रात्र झाली .सकाळी उठून शेतावर गेलो .पावसाची ये -जा  सुरु होती .पायाखाली चिखल होता ,शेतातून पाणी वाहत होतं .थोडया  वेळासाठी  इंद्रधनुष्याचे दर्शन झाले .आवारात सगळं हिरवगार झालं होतं प्राजक्ताच्या फुलांचा गालिचा तयार झाला होता .जवळच असलेलं तिनविरा धरण वाहू लागलंय ते बघायला गेलो उंचावरून पडणारं पाणी आणि उडणारे तुषार आणि गार पावसाळी  हवा  ,  खूप वेगळा अनुभव  होता।.
                 मध्येच  घेतलेली सुट्टी  सर्वांना  fresh  करणारी ठरली .गावच्या नातेवाईकांना दिलेल्या surprise  visits  सर्वांना आनंददायी ठरल्या .
                                                                          
                                   नंदकिशोर  पाटील 
A birthday surprise.

Last month, it was Anagha's friend, Medha's birthday. All her friends love the snacks I give in her tiffin.Her good Friend Medha loved it the best of all. Once, just a week before her birthday, Anagha's friend said,"I would love it if you could get this on my birthday.'' She had said it casually, but Anagha made it a point to inform  me about it. After that both Anagha and her friend forgot about it.But I remembered to send the snack with Anagha on the day of Medha's birthday.When Anagha opened her snack box,both of them were surprised to see the snack inside. She was touched & surprised and she thanked Anagha several times. In the evening, she had hosted a party in a nearby restaurant and all her friends were invited.All of them gave her ready made gifts,frames,etc.But Anagha said she was more happy about the gift Anagha gave her, a mere favourite dish. 
When Anagha told me this when she came back, I was happy I did something for someone without forgetting the happiness it would give that person.
At that incident I thought,"sometimes even small things make a big difference to someone.'' 

-Swati
आमच्या घराजवळील एका विशिष्ट दुकानातून आम्ही रोजच्या वस्तू खरेदी करत असतो. माझ्याबरोबर काहीवेळा उन्मेष असतो. दुकानदार न मागताच प्लास्टिकची पिशवी देतो. मी हटकून ती नाकारतो. 'मागितली नसताना कशाला तू प्लास्टिकची पिशवी देतोस असेही एकदोनदा त्याला विचारले. त्यावर लोक  प्लास्टिकची पिशवी दिली नाही तर उलटे नाराज होतात असेच तो म्हणाला. एकदा उन्मेष एकटाच त्या दुकानात गेला. वस्तू घेतल्यावर नोकराने उन्मेषला प्लास्टिकची पिशवी दिली. उन्मेषने अर्थात ती नाकारली.
मालकाने हे बघितले. तो नोकराला म्हणाला, "अरे तो  प्लास्टिकची पिशवी न वापरणाऱ्या बाबाचा मुलगा आहे. तो ते गार आईस्क्रीम हातातून नेईल, पण  प्लास्टिकची पिशवी घेणार नाही." 
घरी आल्यावर उन्मेषने हे सर्व कथन केले, तेव्हा आपण योग्य तेच केल्याचे समाधान तर त्याच्या चेहऱ्यावर होतेच आणि बाबांबद्दलचा  अभिमानही!!

माझ्या आईचे पुण्याला माझ्या भावाकडे  अगदी अचानक निधन झाले तेव्हा उन्मेष शिबिरातील ख्रिसमस पार्टीला गेला होता. महेश स्वरुपा त्याला गाडीने घेऊन येत असतानाच ती बातमी मला कळली.  विशाखा पुण्यातच होती.  महेश स्वरुपा उन्मेषला बाहेर सोडून जाणार होते, मी त्यांना घरात यायला सांगितले. त्यांना बातमी सांगताच त्यांनी माझी पुढील सर्व व्यवस्था बघितली. स्वरूपाने विशाखाचे पुण्याला न्यायचे कपडे तर ब्यागेत भरलेच वर माझ्या हातात कालवून वरण भात ठेवला. उन्मेषला दुध विचारले. उन्मेषने गडबडून न जाता स्वताची व माझी ब्याग भरली. अगदी मोबाइल चार्जर घ्यायलाही तो विसरला नाही.  महेश स्वरूपाने आणि उन्मेषने तेव्हा मला जी मदत केली ती आधार देणारी होती.
पुढे उन्मेष शाळेत जायला लागल्यावरही काही दिवस साहजिकच अस्वस्थ होता. ते पाहून त्याच्या शाळेतील मराठीच्या रावते बाईनी एकदा वर्गातील सर्व मुलांना 'माझी आजी' या विषयावर निबंध लिहायला सांगितला. उन्मेषला आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी ही संधी मिळाली. तो त्या दिवशी घरी आला तेव्हा थोडा स्वस्थ व निवांत दिसला. शाळेने या छोट्याशा कृतीतून जी जाणीव दाखवली ती आम्हाला तिघानाही भावली. 
डॉ रवी बापट यांनी माझे इतरांपेक्षा वेगळ्या शब्दात सांत्वन केले. " आम्ही सर्व डॉ मंडळी तुझ्या आईला यातनामय जगणे देऊ शकलो असतो पण शांत मरण फक्त ईश्वराच्या हातात असते. ते तिला मिळाले. तुझी आई फार पुण्यवान असणार." या शब्दांनी या प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने मला पाहायला शिकवले. या सर्व घटना माझे मन शांत होण्यास सहाय्यभूत ठरल्या. 
 विकास

Friday, July 13, 2012

एक अनुभव
आमचयाकडे रोज संध्याकाळी एक 10-11 वर्षाचा मुलगा हार फुलपुडी घेऊन येतो. गेल्या महिन्यात त्याला गावी जायचे असल्यामुळे 2 आठवडे फुलपुडी टाकणार नाही असे कळवून तो रितसर रजेवर गेला.
त्या महिन्याचे फुलपुडीचे पैसे घ्यायला आला तो आला तेव्हा मला 15 दिवसांचे पैसे कापणे उचित वाटले नाही. म्हणून मी महिन्याभराचे पैसे देऊ करत होते. त्यावर तो म्हणाला, काकी, मी गेल्या महिन्यात 15 दिवसंच फुलपुडी टाकली तेव्हा मला 15 दिवसाचेच पैसे द्या.
वरून धीटाईने त्याने मला विचारले की घरी देवासमोर दिवाबत्ती तुम्हीच करता की घरातील इतर कोणी? मीच करते असं सांगितल्यावर मात्र त्याच्या भाबड्या चेहऱयावर या काकीला काही समजते की नाही? काही लक्षात राहते की नाही? असा भाव होता.
मी संपूर्ण महिन्याचे पैसे देत असताना त्याने मात्र 15 दिवसाचेच पैसे घेतले.
मला त्याच्या प्रामाणिकपणाचे तर कौतूक वाटलेच अन भाबडया धीटाईचे देखिल.

संगिता खंदारे       


एक संध्याकाळ
हल्ली चिन्मयच्या Tight schedule (Classes, college अभ्यास) मुळे माझ्या शिफ्ट डयुटी मुळे आम्हा तिघांना एकत्र वेळ मिळणे कठीण झाले आहे. मागच्या महीन्यात अचानक त्याचा एक क्लास कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला थोडा वेळ मिळाला.तो वेळ एकत्र घालवण्याकरता आम्ही Marine Drive च्या कटटयावर जाऊन बसलो. संध्याकाळचे वातावरण, समोर पसरलेला समुद्र, सूर्यास्त होई पर्यंत त्याच्या छटा आणि सूर्यास्तानंतर सर्वदूर लागलेले दिवे शा वातावरणात गप्पा मारण्यात वेळ कसा निघू गेला ते कळलेच नाही.
त्या संध्याकाळचा अनुभव आम्हा तिघांसाठी सुखावणारा दुसया दिवशी आप आपल्या व्यापात पुन्हा बुडुन जाण्यासाठी नवी प्रेरणा देणारा होता.
केदार दाणी