प्रिय आ नंद मेवा इट्स ,
पत्रास कारण की मुलांच्या
बद्दलच्या काही गोष्टी
शेयर कराव्याश्या वाटत होत्या हर्षाला तिचा वाढदिवस
शाळेत साजरा करायचा होता
व त्यासाठी काय काय लागतं त्या गोष्टींची
यादी तिनेच मला
करून
दिली अगदी जुजबी म्हणजे
मैत्रिणींसाठी चॉकलेट्स , टीचर्साठी कैडबरी , एक गळ्यालं पेंडंट आणि काजळ, अगदि आधी
म्हणजे सहा महिन्यांपूर्वी
एक फ्रॉक आणलेला
व तो तिने
खूपच कमी वेळा वापरलेला
होता तेंव्हा तिला तोच
घालायचा होता, कानातले
आधी होते तेच
आणि डोळ्यात अगदी कोपऱ्यात
काजळ. नविन कपडे घ्यायचा
सर्व नविन मैचिंग
गोष्टी घ्यायच्या हा मोहही तिला झाला नव्हता कारण तिला
चांगल तिच्या बेस्ट
जजमेंटने
दिसायच होतं. मी सजेस्ट
केलेल पेंडंट तिने
लगेचच अप्प्रूव केल पण सगळच नविन काही
घ्यायच नाही व जे आहे त्यात छान दिसायच हे ति ला
कस काय क्लिअरली वाटत हे
मोठच गौड़बंगाल आहे. ही
तिची
स्वतः च्या apearance बद्दलची
क्लियर आइडिया माझ्या मनाला हुरळवून
गेली. दूसर म्हणजे फेसबुक हे waste of time हे मी तिला एकदा माझ अकाउंट ओपन करशील का हे तिने विचारल्यावर सांगितलं आणि त्यानंतर तिने कधीही मागे धोशा लावला नाही . माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की .. शी .. हे काय तू फेसबूकवर कशी नाहीयेस .. पण तिने कधीच त्यावर काहीतरी कमी आहे अस स्वतःला जाणवू दिल नाही she is fine without facebook in her life . हो ती कंप्यूटर बघते पण आपला ब्लॉग किंवा तिच्या आवडत्या देशाबद्दलची माहिती किंवा त्यांच्या भाषेत काही वाक्य कशी बोलतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते किंवा तिच्या आवडत्या कुकरी शोबद्दलची माहिती किंवा शाळएच्या प्रोजेक्ट बद्दलची माहिती ती बघत असते . प्रवाहात फरफटत न जाण्याच्या तिच्या वागण्याने तिला बराच पल्ला बऱ्याच गोष्टींमध्ये गाठायचा आहे पण जि थल्या तिथे विचार करण्याची पद्धत बघून तिने या पल्ल्यावर उभ रहायची किंवा स्टांस घ्यायची सुरुवात केलीये अस वाटतं.
राहुल बद्दलचा एक प्रसंग असा की रविवारी चॉकलेट खायच्या दिवशी दोघांनाही त्यांच्या आवडीच चॉकलेट किंवा आणखी काही खायच असत त्याबद्दल बजेट ठरलय प्रत्येकी 30 रुपये . एक दिवस राहुलने सांगितल आम्हाला केकपण खायचा आहे मला अजून पैसे दे . मी मनाशी म्हटल दर रविवारी चॉकलेटसाठी पैसे आणि आता काय तर केक साठी अजून पैसे अगदी हक्काने मागतोय , अशाने आपण त्यांना बिघडवतं तर नाही ना ! पण दोन दिवसांपूर्वी केक आणायला हो म्हटलेल म्हणून दिले पैसे . हर्षाने स्वतःसाठी केक नको तर डोनट घेऊन ये संगितल . घरी आल्यावर त्याने दिदिचा डोनट दिला व दुसरया हातात पेडिग्रीच अर्ध पाकिट दाखवत म्हणाला पुढच्या रविवारचे माझे चॉकलेटचे पैसे देऊ नकोस . अस का हे विचारताच म्हणाला रस्त्यात अगदि रोडावलेल कुत्र्याच पिल्लू भुकेने कासावीस होउन कचरयात पडलेल फड़क खात होत मग त्याच्यासाठी पेडिग्री घेतल आणि त्याचे पैसे केकपेक्षा खूप जास्त होते म्हणून पुढल्या रविवारी माझे चॉकलेटचे पैसे देऊ नकोस मग पुढे म्हणाला ते पिल्लू आधी घाबरून काही खाताच नव्हत पण नंतर पटापट संपवायला लागल आणि मम्मा मला खूपच बरं वाटलं ....आणि माझा मुलगा आवडीचा खाऊ खाऊन कसा तृप्त दिसला असता तसा दिसत होता .
पैसे देताना मनात संशय आणणारी मी त्याच्या या वागण्यामुळे मी मला खूप छोटी वाटले व तो खूप मोठा .
......खूप मोठ बोलल्याच होतय पण लोणी खाल्लस काय म्हणून संशय घेता च आ वासून विश्वदर्शन देणारया यशोदेला काहीस असच वाटल असाव .
:) Take care
Aarti ghadi
Aarti ghadi