Tuesday, October 1, 2013

जाहीर निमंत्र
वयम्’ मासिक आणि प्रदीप लोखंडे यांचेग्यान की वाचनालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यंतरी पाचवी ते दहावीच्या मुलांसाठीविचार-स्पर्धा’ घेण्यात आली होती.
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही विचार स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मुलांना दोन वाक्य दिली होती- १) मला ........ स्वातंत्र्य हवे आहे.
२) ....... ही माझी जबाबदारी आहे.
या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून मिळून सुमारे १२,००० विद्यार्थी सहभागी झाले.
  विचार स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भन्नाट विचार मांडले होते. प्रत्येक विद्यार्थ्याचे विचार वाचले गेले. जवळ-जवळ दीड महिना अथक काम करुन सर्व विचारांचे संकलन व पृथक्करण करण्यात आले आहे. 

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ शनिवार ऑक्टोबर रोजी काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सकाळी १०.३० ते या वेळात संपन्न होणार आहे. सर्व सहभागी मुलांचे कौतुक करण्यासाठी कुमार केतकर, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर यांसह अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी आपण नक्की यावेही विनंतीअभिनेत्री आणिवयम्च्या ब्रॅन्ड अम्बेसिडर मृणाल कुलकर्णी याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण या कार्यक्रमाला नक्की यावे, ही विनंती

             कार्यक्रम स्थळडॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह, पोखरण रोड नंबर- ,
             पवार नगर, मानपाडा, हिरानंदानी मेडोजजवळ, ठाणे (पश्चिम)
             वेळ- सकाळी १०.३० ते दुपारी 2. 
- शुभदा चौकर 
             

No comments:

Post a Comment