Saturday, February 15, 2014

कविता

 Hello,
दहावीतल्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी मी केलेली ही कविता-


शाळा सोडताना डोळे डबडबतील 
शाळेतले अनेक अनुभव मनात तरळतील

शाळा हे दुसरे घरच होते
पालकांसारखे आस्थेवाईक शिक्षक होते

अरे हे कर, ते कर, शिक्षक होते सांगणारे
चुकल- माकल तर माफ करणारे, समजून घेणारे

मित्रमैत्रिणींचे प्रेम लाभले निस्वार्थ
त्यातच दडला होतं शालेय जीवनाचा अर्थ

शाळेच्या मजा खूप एन्जॉय केल्या
निरोप देताना मनात दाटून आल्या

पी.टी. च्या पिरेडला घातला असेल धुमाकूळ,
कधी नुसत्या चकरा, कधी gossiping, तर कधी खेळ

क्रीडादिनाची मजा तर काही औरच
नवे-नवे विक्रम करण्याची चुरसच

हे सगळे अनुभव मिस कराल
आठवणींच्या पोतडीत कायमच जपून ठेवाल

तुम्हा सर्वांना all the best
उत्तम मार्कांनी जिंकाल हि महत्वाची टेस्ट

विसरू नका शिक्षकांना, शाळेला
नक्की येत जा नियमित भेटायला!!!

-मल्लिका चौकर


2 comments: