Tuesday, November 3, 2015

लताआजींचे पत्र 

.. वि. वि.

अलिकडे आपल्या भेटी वारंवार घडत नाहीत. त्यामुळे तुम्हा सर्वांची खूप आठवण येत राहते, विशेषतः ‘टीनएजर्स’च्या शिबिरानंतर.

मुलांशी शिबिरात छान गप्पा घडतात. त्यामुळे ती कशी अनेक अंगांनी वाढत आहेत ते लक्षात येतं. ते दोन तास मला इतका आनंद आणि कृतकृत्यता देतात की ती शिदोरी मला पुढे महिनाभर पुरते. एकेका मुलाचे दिसणारे, त्याच्या व्यक्तिमत्वाचे विकसित होत जाणारे पैलू तुम्हाला सांगावेसे वाटतात. तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवावासा वाटतो. म्हणून विकासच्या मदतीने ब्लॉगवर पत्र टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यात अनियमितता राहील हे खरे, पण सातत्य मात्र राखायचा प्रयत्न करणार आहे.

पुढील एखाद्या पालकसभेत आमचे मित्र श्री. माधव आपटे यांना बोलावण्याचे माझ्या मनात आहे. ते आहेत ८२ वर्षांचे. एकेकाळी ते आपटे समूहाचा खूप मोठा विविध उद्योगांचा पसारा सांभाळत होते. भारताच्या क्रिकेट टीमचे ते सलामीचे फलंदाज होते. या दोन्ही क्षेत्रात वावरताना त्यांना अनेक माणसं भेटली. वारंवार यश अपयश येत गेलं. त्या सर्व वाटचालीत त्यांनी बरेच मित्र जोडले. त्या सर्व मित्रांच्या मनात आजही माधव आपटेंची प्रतिमा एक सुसंस्कृत, ऋजू स्वभावाचा, उमदा मित्र अशीच आहे. माधवनं श्रीमंत उद्योजक असूनही माणसं कधी वापरली नाहीत. त्यानं ‘मैत्र’ जपलं. असा माणूस तुम्ही पहावा, त्याच्याशी गप्पा कराव्या, असे मला वाटते. तुम्हाला हे कितपत आवडेल ते ब्लॉगवर कळवा. म्हणजे त्यानुसार मला कार्यक्रम ठरवणं सोप जाईल.

ता.. --- डिसेंबरच्या दुसऱ्या शनिवारी ‘A Bronx Tale’ ह्या चित्रपटासंबंधी चर्चा आहे. त्यातून संस्काराचं मर्म समजेल. 
म्हणून प्रत्येकाने तो चित्रपट पाहून पालकसभेला येणं अपेक्षित आहे.

-- लताआजी  

8 comments:

  1. नक्कि चालेल लेखिका मोनिका गजेंद्रगडकरांचे पुस्तक वाचण्यास घेतले आहे

    ReplyDelete
  2. अजून एका सुंदर व्यक्तिमत्वाची भेट आणि त्याचा अनुभव नक्कीच आवडेल.Thank you Lataaji.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Nakkich bhetayala avadeol.Tyanchya anubhavatun kahitari shikayala milel.

    ReplyDelete
  5. Thank you Lata Aaji. Every time you take so much effort and give us opportunity to understand a total different approach to live our life more happily and make necessary changes as its applicable to individual.
    We will surely put our efforts and interest to learn more about them before this meeting.

    ReplyDelete
  6. Yes Lata. Aji. We would. Like to meet. One more great personality.v

    Archana

    ReplyDelete
  7. हो अाजी , त्याना जाणून घ्यायला आम्हाला मनापासून आवडेल.

    ReplyDelete
  8. Yes Lata Aaji ,we would definitely like to meet him. We will surely take efforts to know more about him. Thankyou Aaji for giving us such opportunities and for efforts taken for us always.

    ReplyDelete