Sunday, December 13, 2015

‘A Bronx taleचित्रपटाविषयी आणखी थोडेसे----

चित्रपट पाहून मला काही प्रश्न पडले आहेत.

आठ वर्षे तो मुलगा सोनीच्या संपर्कात असतो. या आठ वर्षात त्याच्या बाबांचे आणि त्याचे नाते कसे असते याचा काहीच थांगपत्ता चित्रपटात लागत नाही. बाबाला तो सातत्याने सोनीच्या संपर्कात आहे हे कळत नाही का? कळत असेल तर त्यांच्या दोघांच्या नात्यात या काळात काहीच 'खळबळ' होत नाही का? आठ वर्षे, ती सुद्धा अशा वाढत्या वयाची, ही दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाहीत. क्षणभर असे गृहीत धरले की बाबा हे सर्व संयमाने स्विकारतो, मुलावरील आणि स्वतावरील आपला विश्वास आणि प्रेम तो जराही कमी होऊ देत नाही, तरी एक प्रश्न उरतोच.

त्याच्या आईची या सगळ्या घटनावर काय प्रतिक्रिया होती? आई नोकरी करताना दाखवलेली नाही. तिला तर डोळ्यादेखत तिचा वाढत्या वयाचा मुलगा गुंडांच्या सहवासात दिसत असणार.  एका बस चालकाबरोबर ती समजून उमजून संसार करत असते आणि त्यात ती समाधानी आहे असेही एका दृश्यात दाखवले आहे. पण समाधानी असणे वेगळे आणि मुलाच्या भवितव्याविषयी काळजी नसणे वेगळे. चित्रपटात आईच्या जीवाची घालमेल अजिबात दिसत नाही. प्रत्यक्षात आई याबद्दल खूप काळजी करणारी आणि कदाचित त्या काळजीपोटीच काही वेळा उतावीळ होऊन 'overreact' होताना आपल्याला दिसते. 

प्रामुख्याने वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर चित्रपटात भर दिलेला आहे हे मान्य केले तरी आई- बाबा दोघे मिळून (as a marriage) ह्या सगळ्या प्रसंगांना सामोरे जातात का ? जात असल्यास कसे सामोरे जातात ? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. त्या दोघामधला मुलाविषयीच्या कळकळीचा काहीच संवाद चित्रपटात नाही.

त्यामुळे चित्रपट पाहून झाला तरी काहीतरी पोकळी जाणवत होती. मात्र शिबिरात झालेल्या चर्चेत आयाच अधिक आणि अगदी मनापासून बोलल्या त्यामुळे ही पोकळी भरून निघाली. मी चित्रपटातील जी उणीव दाखवत आहे तीच त्यांच्या बोलण्यातून एकप्रकारे अधोरेखित झाली. असो. 

ह्या साऱ्यामुळे चांगला चित्रपट पाहणे आणि त्यावर अशी चर्चा करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे हे परत एकदा लक्षात आले.  


---विकास परांजपे

3 comments:

  1. Maybe director wants to focus on father/son relationship in this movie. That is not such an uncommon tactic. Like I do not remember mother in "Bicycle Thieves" also.

    But in such good movies; you can always speculate about these "what if" and "why" issues and make up a story of your own. Its a bit like soft focused photo where all details are not clearly visible.

    ReplyDelete
  2. I agree with Milind that this movie is basically showing a impact of two men in 'C' life.One living with his values and other from underworld but also living with his own set of values.

    secondly as you said for eight years the father was knowing that C was in contact with sonny ..if you remember in a scene when father returns back the money and walks with 'c' holding in his arms in background narration he says from that day my father never spoke to sonny and i never listened to my father to be away from sonny. It means that father kept on telling him patiently all these years that he should not be in sonny's company.

    ReplyDelete
  3. May be i have missed this dialogue. I do agree with Milind too although in in Bicycle thief fathar and son both were out of home for a day.

    ReplyDelete