१४/१/२०१५
तुम्ही सर्वांनी BLOG वर माझ्याशी केलेल्या गप्पा आवडल्या. आपलं जगणं अधिक
सकस करायचे कष्ट करताहात याचा खूप आनंद झाला. जगणं सकस करायचं तर
आधी आपण आला दिवस कसा घालवतो आहोत याकडे डोळ्याला डोळा भिडवून
पाहयला हवं. इथं भ्याडपणा चालत नाही. ते धैर्य तुमच्यात आहे.
जगण्यात आनंद भरलेलाच असतो. तो आपला आपणच हरवून टाकतो. बेजबाबदार,
स्वार्थी जीवनशैलीपायी तो हरवतो. आनंद हरवला, की जगणं म्हणजे निव्वळ चिखल
बनत. पाणी आणि माती ही दोन्ही पंचमहाभूतांपैकीच. नवनिर्माणाची अपार क्षमता
या दोघांपाशी आहे. पण त्याचा जर चिखल केला तर त्यात उत्तम बीजही कुजून
जात.
उत्क्रांतीच्या वाटेवर आपल्याला हा नवा विकसित मेंदू लाभला. त्याच्या मदतीनंच माणसानं
जगणं सुखकर करण्यासाठी नाना शोध लावून तंत्रज्ञान विकसित केलंय. पण सुखकर जगणं हवं,
तर आधी ते आपणं सुसह्य केलं पाहिजे. स्वार्थ, निराशा, द्वेष हे सारे जिणं नकोसं करतात. या
नव्या मेंदूतून लाज, द्वेष अशांसारख्या नव्या भावना माणसात उपजल्या. लाज सोडली, की
आपण कोडगे होतो. संवेदनशीलताच मनोमन हरवून बसतो. द्वेषाची आग तर सारंच जाळून
टाकते. आनंदाची छोटीशी झुळूकही आपल्याला निवांत करते. आपल्या वाटल्या अनेक माणसं
योगायोगाने येतात. आपणं त्या साऱ्यांना स्वीकारुया. त्यांच्याशी प्रेमानं वागलो, तरच ज्याचा
आपल्याला त्रास होतो असे त्यांच्यातील दोष दूर करायचा ते प्रयत्न करतील. दुसऱ्यांनी
आपल्याला सुखी करावं ही अपेक्षा करण्यापूर्वी आपणं आधी ते जसे आहेत तसेच त्यांना
स्वीकारुया. त्यानं आपलीच ताकद वाढते. आपणं हळुहळू सर्वांवर निरपेक्ष प्रेम करू लागतो.
जगण्यातला सगळा आनंद या निरपेक्ष प्रेमात साठवलेला आहे.
आपलं जगणं आणि वागणं पारदर्शक ठेवणं हे आपलं संसारातलं आद्य कर्तव्य आहे. जेव्हा
आपल्याला स्वत:च एखाद वर्तन चोरून करावंसं वाटत, तेव्हा ते बहुधा अनैतिक असत.
आपल्या वाट्याला आलेल्या भल्याबुऱ्या माणसांचा आणि सुखदुःखाचा सहज स्वीकार करत
आपणं जगायला हवं. एकदा एका पालकानं मला छान सांगितलं, ती म्हणाली, ‘ देव
आपल्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटना एखाद्या स्लाईड शो सारख्या ठेवतो आणि
विचारतो , ‘याला क्षमा करशील अशी शीलता अंगी बाणवत ती मुलगी आज जगते आहे.’
‘व्यथा असो, आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे’
या श्री. मंगेश पाडगावकरांच्या ओळी त्यांनी स्वत:च्या जगण्यातून आपल्याला दाखवल्या,
जीवनात सुखदु:ख आहेच, पण ते सारे निसर्गाचे ‘बहाणे’ आहेत. हे ओळखल्यावरही
‘डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले गाणे’ अशी परिस्थिती त्यांच्यावरही वारंवार येतच
राहिली. पण त्यांनी स्वत:चे आतलं गाणे हरवू दिले नाही. पाडगावकर गेले पण स्वत:च्या
काव्याप्रमाणे स्वत:च्या जगण्यातूनही त्यांनी जगण्यावर प्रेम करून निकटवर्तीयांना दाखवलं.
त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी म्हणाली, जगण्याला लायक केलं बाबांनी मला.’
हे सारं जमवत जमवत जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं. आपणही जीवनातला आनंद हरवू न
देता जगूया आणि दुसऱ्याच्या आनंदाआड न येण्याबाबतही आपण दक्ष राहूया.
-Lata Aji