Tuesday, January 5, 2016

मी ज्ञानेश्वरी वाचत असते तेव्हा तेवढ्या काळापुरतं तरी मला जगनमाऊलीच्या कुशीत विसावल्यासारखं निवांत वाटतं. खूप शांत शांत वाटतं. माझ्या आणि ज्ञानेश्वरांच्या मनमुराद गप्पा होतात.
काल वाचता वाचता ज्ञानेश्वरांच्या एका दृष्टांतानं मी अगदी चकीत झाले. विषयवासनेनं खुळावलेल्या आणि त्यापायी अत्यंत हीन पातळीवरचं जिणे जगणाऱ्या माणसाचं त्यात वर्णन होतं. त्या माणसांना ज्ञानेश्वरांनी ‘पूयपंकीचे किडे’ असं म्हटलंय. पूयपंक म्हणजे जुनाट, चिघळलेल्या जखमेच्या पृष्ठभागावर जमलेला पुवाचा चिखल. ज्ञानेश्वरांची विज्ञानाची जाण पाहून मी अगदी नतमस्तक झाले.
पुयपंकीचे किडे म्हणजे वैज्ञानिक परिभाषेत Anaerobic bacteria’. हे जीवजंतू पुवाच्या चिखलातच वाढू शकतात. त्यातील गोम अशी की पुवाच्या चिखलात प्राणवायूचा अभाव असतो. म्हणूनच ते वाढू शकतात. प्राणवायूशिवाय ते मजेत जगतात आणि आपली प्रजा वाढवतात.
हे वाचताना माझ्यातलं शहाणपण म्हणालं, हे जिणे तुझ्या जिण्यासारखच की? अवतीभवती इतकं हवेच प्रदूषण आहे. अन्न, पाणी सारे दूषित आहे. भयावह वाटाव इतका भ्रष्टाचार, शोषण, सारं बोकाळलंय, तरी तुम्हाला कुठं त्यापायी गुदमर जाणवतेय? तुम्ही सारेच अगदी मजेत जगताय की.’
बापरे! म्हणजे ज्ञानेश्वर मला माझीच पातळी दाखवताहेत तर नाही. मी माझीच सफाई माझ्या शहाण्या मनासमोर मांडू लागले. त्याला म्ह्टलं, ‘काय वाईट आहे त्यात? एवढया पुयपंकात मजेत जगतो आहोत हे कसं काय वाईट? ते ‘anaerobic bacteria’ प्राणवायूच्या अभावातही टिकून राहाताहेत. माणसानं अक्कल हुशारी वापरुन शोधून काढलेल्या नवनवीन प्रभावी एण्टीबायोटीक्सना दाद न देता जगताहेत. आपली प्रजा ते अधिक कणखर, जगण्यालायक बनवताहेत.’

त्यावर माझं शहाण मन उत्तरलं, ‘अवतीभवतीच्या उपभोगांच्या झमेल्यात, बेगडी दुनियेत रमल्यानं एका मह्त्त्वाच्या गोष्टींचा विसर पडतोय तुला. ज्ञानेश्वरी वाचताना सगळ अवधान एकवटून वाचत चला, असं ज्ञानेश्वर वारंवार बजावताहेत नं? पण अहंकार थोडा बाजूला ठेवून विचार करणे जमतच नाही तुला अजून. हे पुयपंकीचे किडे जगतात. अगदी भराभरा प्रजा वाढवतात हे खरं. पण अवघा जन्म माणसांना रोगी बनवण्यातच जातोय त्यांचा. प्रजननासोबत आपल्याजातीची विषप्रवृत्तीच वाढवायचा खटाटोप चाललाय नं त्यांचा? सारी शक्ती या दोन गोष्टीतच घालवताहेत ते.
त्या किड्यासारखं जगायचं आणि वर त्या जीवनशैलीचाच अभिमान बाळगायचा तर इतका उत्क्रांत मानव जातीतला जन्म हवाच कशाला तुला?

----- लता काटदरे

9 comments:

  1. A very true depiction of the way one is living in today's society.Though one knows & understands the path of righteousness but lacks the courage to face it with the head held high. It is easier following the escapist route rather than confront the truth. But should one be blamed for it? The world around us is full of such people who both directly & indirectly are controlling ones life. Even after preaching by so many saints hardly a handful have travelled the noble path. There is a constant worry & insecurity regarding the situations one faces on regular basis and the opportunities the future holds for the next generation.
    Its true life was not bestowed upon me by the almighty to give reasons and grumblings. It is not necessary that we change the world, but atleast make a beginning in changing ones self.
    DARE
    Lest I take a wrong step
    Fear of landing on the right
    The joys that await me on the other side
    To give away the pleasures on the leeward
    Change by bit
    Try the path wayward
    Though not it leads to guile & guilt
    but plunges me in bliss
    Kiran






    ReplyDelete
  2. In spite of all social parasites, all evil things, the good too has prevailed. And mankind has thrived. Since life or no life is not a matter of choice and life just wants to be, bare minimum one can do is not add to the evil or be at the giving end of exploitation. Wish we can do something more concrete and keep our sensitivities alive.
    There is always a blossoming Sonmohur, a rising sun, chirping birds, loving people around to keep the hope and  reason to keep life going.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. मी हा ञानेश्वरीमधला हा दृष्टांत वाचला आणि भारावून गेले कि असे काही जीव आपल्या शरीरात वाढतात आणि आणि त्यांना पिळून शरीरात मधून बाहेर काढले तर खर्या अर्थाने स्वस्थ आयुष्य आपण जगू शकतो.

    हे सारे काही वाचताना आनंदयात्रा पुस्तकामधले " पैशुन्य" मला आठवले. इथे माझे आयुष्य आणि त्या जखमेत वाढणाऱ्या जीवाचे जगणे सारखेच म्हटलंय कारण त्याला oxygen शिवाय वाढता येतंय आणि आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा घटक असलेला oxygen आपल्याला अगदी फुकट मिळतोय तर त्याची थोडीही कृतद्नता माझ्या आजच्या जगण्यात दिसून येत नाही आणि त्या पलीकडे ज्या गोष्टी जीवनात अगदी नगण्य महत्व ठेवतात त्या विषयसुख मागे व्यक्ती स्वातंत्र्य च्या नावाखाली मी अतिशय चुकीची जीवनशैली स्वीकारली आहे. मग इतकाच विचार येतो कि हे जे खाणे मज्जा करणे आणि जसा आला तसा दिवस ढकलणे हा भाग बंद करून थोडा स्वतःला काही हि कष्ट न घेता सहज मिळालेल्या गोष्टीं बद्दल कृतज्ञ राहून जगायला सूरूवात केली पाहिजे.आजूबाजूला सध्या वेग वेगळ्या स्वरुपात हेच जगणे दिसते पण मी या मोहाला बळी न पडता माझी स्वताबाद्दलची जाणीव मी बळकट करायला हवी.
    आज जे मनुष्य जन्म मला मिळालाय त्याचा मी आदर करून मझ्यातले पशु गुणा वर मात करायला हवी. स्वीकारायचे असेलच तर समाजात जी माणसे हे करू शकले त्यांची जीवनशैली आपण समजून घेऊन त्या प्रमाणे योग्य तेबदल आपणात करू शकतो

    ReplyDelete
  5. Lata Aaji, read your blog.
    I am sharing one thought which came in my mind.
    When 98-99 people out of 100 follow a path (which is unethical or a wrong way of leading life) that becomes the "correct way", and the remaining hand full of people who don't want to follow that path with conscious efforts, they are outcastes or declared wrong or are humiliated.
    Is this sence of being outcastes or humiliation, 'gudmar' of your post?
    As somewhere deep in mind we are sensing that whatever we are doing is correct although it is 'uncommon'.However the response we get from outside is not matching with our thoughts,and we require a lot of courage and self confidence to persue our path.

    ReplyDelete
  6. Archana here writing from anands account.

    ReplyDelete
  7. शेवटचा ४ओळी मला जास्त जाणवल्या ईतका वाईट परीस्थित जगंण पाहिजे कशाला! आपण ज्याला ऊत्कांती म्हणतो ती मानवाला रसतळा नेतेय मग अस पृरत परत जन्म घेऊन जगण्या पेक्षा या फेर्यातुन लवकर सुटका होण्या करता प्रयत्न करणे आवश्यक.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete