वाटेवरचं हे सोनमोहोराचं
झाड.
ऐन शिशिरात, असं एकाच
फांदीवर
पिवळेजर्द गुच्छ मिरवत,
झुलवत रमलेल पाहिलं,
तेव्हा वाटलं....
हे झाड किती जुनं! अगदी
माझ्यासारखंच
म्हातारं आहे हे.
किती ऋतूचक्र उपभोगली,
सोसली असतील
आजवर त्यानं.
त्याचं नुसत्या वसंताच्या
चाहुलीनं या वयात
असं लुटुपुटुच बहरणं किती
छान ! किती सुंदर !
क्षणभर हेवा वाटला त्याचा.
आठवणींच्या खेळातच विसावा
शोधायचं
खरं तर त्याचं वय.
या वयातही असं फुलता येत
कोणाला ?
मी त्याच्याकडे कौतुकाने
पाहिलं,
तेव्हाही ते माझ्या जरठपणाला
हसत नव्हतं, हिणवत नव्हतं.
हेही किती कठीण नं !
एकदा वाटलं, इतकं आत्ममग्न
जगत राहिल्यावर इतरांची
वर्दळ, लगबग जाणवणारच कशी
याला ?
पण लगेच ध्यानात आलं की
हे आत्ममग्न पण नाही
त्याचं.
हे आहे ‘स्वस्थपण’
या स्वस्थपणातच
हे असं बहरणं झुलणं जमू
शकतं
अगदी आपोआप.
----- लता काटदरे
मी ही कविता खुपदा वाचली, पूर्णपणे समजे पर्यंत आणि मग विविध अर्थ मनात येऊ लागले.
ReplyDeleteकवितेमधले ते सोनमोहाराचे झाड जणू काही जगायची एक सुंदर पण अतिशय महत्वाची पद्धत दाखवतंय.
मी खूप विचार करत राहिले आणि माझ्या भवताली असलेले जगाकडे पाहू लागले. विचार आला जेव्हा हे झाड त्याच्या ऎन तारुण्यात कसे बरे बहरत असेल. मग मी माझ्या आयुष्याकडे पहिले आणि विचार आला खरच एवढे उन्हाळे पावसाळे ऋतू बदल त्याने पहिले आणि कित्येक वेळा सोसले पण त्याने प्रत्येक ऋतूत ल्या परिस्थिती ला मोकळ्या मानाने स्वीकारले आणि त्यात त्याचा आनंद शोधत आजू बाजूच्या जीवनाला ही त्याचे रंग देऊन गेला. मी हाच विचार करत होते कि प्रथम दर्शनी ते स्वता मधेच रमलेले झाड वाटते पण खर तर त्याने खूप आधीच शांत पणे निसर्गातले बदल स्वीकारत अतिशय सुंदर पणे आपले आयुष्य जगायची पद्धत दाखवली.
मी स्वस्थपणे जगणे कसे असते या वर भरपूर विचार केला आणि मग जाणवले कि या सोनमोहोराच्या झाडाने तो त्याच्या जीवन पद्धतीत दाखवून दिला आहे.
जसे त्याने निसर्गातले होणारे बदल स्वीकारले ते पण कधी बहरत,कधी आनंदात डोलत तर कधी तीव्र ऋतुबदल सोसत, तसेच आपल्या आयुष्यात हि सतत बदल येत राहणार , कधी सुखावणारे तर कधी मनाची तयारी नसताना येणारे दुःखाचे बदल पण हे झाड आपल्याला ते सगळे बदल शांत पणे स्वीकारत आपले आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवताय जे नक्कीच पाहणाऱ्याला एक नवीन प्रेरणा देतंय. अजून बरंच काहीआहे पण मला हा विचार मनात आला जेव्हा कवितेमधले ते सोनमोहोराचे झाड
कवितेमधले ते सोनमोहोराचे झाड डोळ्यासमोर आले.
ReplyDeleteमला हि कृवीता वाचल्यावर जाणवल आपण पण आता तसेच हळू हळू शांत स्वस्थ हौत जिवनाचा आनंद घ्यायला पाहिजे
ReplyDeleteमला हि कृवीता वाचल्यावर जाणवल आपण पण आता तसेच हळू हळू शांत स्वस्थ हौत जिवनाचा आनंद घ्यायला पाहिजे
ReplyDeletehttp://tradingfantasy.blogspot.in/
ReplyDeletehttps://3.bp.blogspot.com/-YFhjcbgu9GY/WNMoi9LHm0I/AAAAAAAAABc/duCODU5VAhopeVqCBgwl2Dk_bQFspeZsQCLcB/s1600/Fullscreen%2Bcapture%2B3142017%2B123409%2BPM.jpg
ReplyDeleteJayant Ingole felicitated by Mahesh Kothare
ReplyDeletehttp://tradingfantasy.blogspot.com/2017/04/jayant-ingole-declared-to-be-super.html
www.tradingfantasy.blogspot.in