Wednesday, March 27, 2013

tawny coster
आजपर्यंत  मला असं कधी वाटलंच नाही की आपण आपल्या चांगल्या आठवणी डायरीत लिहाव्या ,पण आज सबंध दिवसात  जे काही  घडलं ,त्यावरून असं वाटलं की आपण हा प्रसंग लिहून ठेवावा . त्याच्यातून मला सचिनला ,यशोधनला बरच काही शिकायला मिळाले .
       गोष्ट सुरु झाली जून महिन्यापासून ,मी व सचिन काही कामासाठी पुण्याला गेलो होतो ,येताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो ,बाहेर पडताना माझी नजर पडली एका वेलीवर . त्याच्यावर एक जांभळट ,खूप सुंदर फूल होतं . मला वाटलं याचं कटिंग  घेऊन घरी लावावं म्हणून मी त्या मालकाला विनंती  केली कि ,मला कटिंग द्याल काय ?त्या बाई ना आश्चर्य वाटलं कि असं काय आहे त्या फुलांत ? त्यांनी  ते कटिंग दिलं ,मी लगेच घरी आल्यावर त्याला आमच्या बागेत लावलं . एक नवीन सदस्य आमच्यात आला . पावसाळा असल्यामुळे वेल छान वाढली . नंतर छान फुलं यायला लागली . त्या फुलाचं नाव काय हे मला माहीतही नव्हतं . पण मागच्या आठवड्यात आनंदमेव्याच्या ब्लॉगवर शैलजा ने तिच्या घरच्या बागेतले फुलांचे फोटो पाठवले ,त्यामुळे त्याचे नाव कृष्णकमळ आहे हे  समजले . मग नंतर मला त्याच्यावर अळ्या दिसल्या आणि त्या अळ्यांनी पानांना खाल्लं होत . मी आधी घाबरले कि वेलीला तर काही होणार नाही ना ?मग मी ओम ला फोन केला ,त्याने मला लगेच सांगितलं की कदाचित तिथे कोश तयार फुलपाखरं येणार . त्या दिवसापासून मी,यशोधन ,सोनाली, आम्ही लक्ष देऊ लागलो .
          कोश अगदी लांब अळी सारखा पण पांढऱ्या रंगाचा आणि त्याच्यावर  तपकिरी रंगाचे ठिपके होते . दुपारी कोशाचा रंग ग्रे व्हायला लागला . मी परत ओम ला फोन केला ,त्याने अगदी exactlyआणि confidently सांगितले की त्याचा जन्म सकाळी सात ते अकराच्या मधे होणार . त्याप्रमाणे आज सकाळी जाऊन बघते तर कोश फुटून फुलपाखरू बाहेर मातीत होतं ,पण त्याला काळ्या मुंग्या लागल्या . त्याला अलगद हातावर घेऊन मुंग्या बाजूला केल्या पण तो पंख हलवत नव्हता ,मग सकाळी परत डॉ ओम ला फोन केला ,त्यानी सांगितले सुर्यप्रकाशात ठेव ,त्याचे पंख सुकले की तो उडेल . हे सर्व यशोधन बघत होता आणि मला मदत करत होता . मला तर असं वाटलं की जणु खरच लहान बाळाचा जन्म झाला . त्याला बघायला यशोधन चे मित्र पण आले . त्यांना बर्फी दिली .
           पण दुर्दैवाने त्या फुलपाखराच्या पंखाला काही problem होता  त्यामुळे तो उडू शकत नव्हता . मला त्याचं फार वाईट वाटलं . मी मध द्यायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही .तेवढ्यात अनिताचा फोन आला ,संत्रं सोलून ठेऊन बघ असं सांगितलं ,आणि मी तसं केलं ,आणि त्याला झाडातच ठेवलं ,पण ते करताना एकीकडे फार वाईट वाटत होतं की आता त्याला उडताच येणार नाही ,आणि स्वच्छंदपणे उडण्याचा आनंद घेता येणार नाही . सचिन तरी मला म्हणाला ,धनश्री सोडून दे त्याला ,असं सांभाळून त्याला आनंद मिळणार नाही आणि असं जगण्याला काय अर्थ ?मला तर रडायलाच आलं . पण मी त्याला झाडातच सोडलं . शेवटी तरी त्याला नेचर बरोबर राहू दिलं .
          या प्रसंगातून हे कळलं की आपण आपले प्रयत्न करायचे ,बाकी सर्व त्या देवाच्या हातात . तोच हे सर्व जग बनवतो . निसर्गाचा तर हाच नियम आहे ,मातीतून येतो आणि मातीतच मिळतो . यशोधानला फार राग आला जेंव्हा मी म्हणाले की एखादेवेळी तो वाचणार नाही . He is also not ready to accept it.It shows that children are so innocent and possitive.या प्रसंगातून यशोधनला बरच काही शिकता आलं . हे सर्व घडत असताना कितीतरी लोकांशी सबंध आला ,खूप गोष्टी कळल्या . कृष्णकमळाच्या फुलाची गोष्ट ओम कडून कळली . ती अशी सगळ्यात बाहेरचं वर्तुळ म्हणजे कुरुक्षेत्र ,मधलं वर्तुळ म्हणजे कौरव  ,आतलं वर्तुळ म्हणजे पांडव आणि मध्ये श्रीकृष्ण . या प्रसंगाच्या निमित्ताने मी अपर्णा आणि सर्वेश सोबत पण बोलले आणि तोमी काढलेले फोटो ब्लोगवर घालायला  तयार झाला . हे सर्व घडलं ते या चांगल्या समाजामुळेच .
    I would like to thanks my parents who are very cultured.       once again thank you Om,Sarvesh and Aparna,and I always feel that I am so lucky to have such good husband,loving mom in law,caring sister in law,loving son and loving families of Anandmeva.

धनश्री .
           
       

No comments:

Post a Comment