Thursday, May 2, 2013

विद्याताईंविषयी...

sorry, मी तुम्हाला गेल्या महिन्यांत म्हटले होते की, मी विद्याताईबद्दल मला जी माहिती आहे, मला काय वाटते, ते ब्लॉगवर टाकेन, पण शेवटी आज लिहायला बसले. मधल्या काळात वेगाने काही घाटन घडल्या, त्यात राहून गेलं. गेल्या महिन्यात निखिल कामानिमित्त स्वीडनला गेला. त्याच दिवाशी  माझ्या नव्या मासिकाचे- वयम्- प्रकाशन झाले. गेल्या आठवड्यात मल्लिका अचानक स्वीडनला गेली. खूप धावपळ करून ५ दिवसंत तिचा विसा केला. ती स्वीडन आणि नेदरलंड ला जाऊन १७ मे रोजी येईल. ती येतान एकटीने प्रवास करणार आहे. असो... मुख्य म्हणजे मी पत्रकार आहे, आणि डेडलाईन उभी ठाकल्याशिवाय माझ्या हातून काम पूर्ण होत नाही. आता विद्याताई परवा भेटणार म्हटल्यावर आज लिहायला बसले. मनापासून सॉरी.. उशीर केल्याबद्दल---

विद्याताई या महाराष्ट्रातील स्त्री-वादी चळवळीच्या प्रणेत्यापैकी एक. १९६४-६५ पासून त्या `स्त्री' मासिकाच्या संपादनात होत्या. १९७५ पासून महाराष्ट्रात स्त्री-मुक्ती चळवळ सुरू झाली.  त्यांत अग्रणी होत्या- शारदा साठे, छाया दातार, ज्योती म्हापसेकर, विद्या बाळ, नीलम गोर्हे.. अशा काही जणी. चळवळीच्या माध्यामातून त्याचे स्त्रीवादी काम ठिकठिकाणी चालू असताना त्यानी १९९० च्या सुमारास` मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. सुरुवातीपासून त्या `संवाद' नावाने संपादकीय लिहू लागल्या. त्यांच्या या संवादातून त्यानी स्त्रीमुक्तीचा नवा पैलू मांडला. त्यावेल स्त्री-मुक्ती म्हणजे पुरुषांवर आगपाखड, पुरुषांना विरोध, त्यांची अवहेलना असे काहीसे मत समाजात तयार झाले होते. विद्या बाळ यांनी ते खोडून काढले. त्यानी स्त्रियांचे अनेक प्रश्न मांडले. तिच्या कामाचे मोल, तिलाही आराम हवा, तिला सुपरवुमन का करायचे, अंधश्रद्धामुळे स्त्रीचे शोषण कसे होते, तिचा लैगिक छळ, तिला सत्तेपासून दूर ठेवणे... असे कितीतरी प्रश्न त्या मांडत गेल्या. आणि हे करताना समाजाला- स्त्री-पुरुष सर्वाना अपील करत गेल्या, की पुरुष-स्त्री भेद सोडा, पण माणूस म्हणून विचार करा की हे योग्य चाललाय का! स्त्री-पुरुष दोघांनीही माणूसपण जपावं, ते वाढवत न्यावं- असे त्या मांडत गेल्या. त्याची भूमिका कायम लिंग-समभाव रुजवणे ही होती. स्त्रिया आणि  पुरुषही लिन्ग्विषयक stereotypes मध्ये अडकलेल्या असतात. ते दूर ठेऊन आपण सहृदयता आणि वैचारिक प्रगल्भतेने वाटचाल केली तर समाज म्हणून पुढे जाऊ शकू- हे त्या वारंवार सांगतात. समतेचा विचार ठामपणे तरी संयतपणे कसा मांडायचा याचा वस्तुपाठ विद्याताईनी घालून दिला आहे. म्हणून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. त्या फक्त लिहून थांबल्या नाहीत, तर राज्यभर ठिकठिकाणी सखी मंच स्थापन करून महिलांना एकत्रित केले. त्यांचे कृतीशील प्रबोधन केले. त्यांचा पुरुष उवाच गटही कार्यरत आहे, ज्यात समतावादी पुरुष एकत्र येतात. आज वयाच्या ७५ नंतरही त्या राज्यभर फिरत असतात, सतत कार्यशील असतात. त्या मनाने टवटवीत आहेत. त्यांचे व्यत्कीमत्त्व प्रेरणादायी आहे. स्पष्ट विचार, ओघवती भाषा आणि नेमकी मांडणी यामुळे त्यांचे बोलणे सर्वसामान्य ग्रामीण महिलेपासून उच्चशिक्षितांपर्यंत सर्वाना समजते, भावते.
लताआजीनी त्यांना शिबिरात बोलावल्यामुळे आपल्याला एक अपूर्व संधी मिळत आहे.
-शुभदा चौकर

2 comments:

  1. शुभदा ,आम्हाला माहिती देण्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  2. Thanks Shubhada for providing the information and managing to do this in your tight schedule.

    ReplyDelete