Tuesday, May 28, 2013


 मी, आई आणि माझे बाबा असे आम्ही तिघेजण गावाला गेलो होतो. आमचे गाव हे राजापूर तालुक्यात आहे. आम्ही संध्याकाळी ठीक ६:३० वाजता गावात पोचलो. तिकडे गेल्यागेल्या मी पक्षी बघण्यासाठी बाहेर पडलो.पण काळोख झाल्यामुळे मला एकही पक्षी दिसला नाही. म्हणून मी घरी आलो आणि घरीच time pass केला. रात्री आम्ही जेवलो आणि लगेचच झोपी गेलो. 
                                 दुसऱ्या दिवशी मला बाबांनी ठीक ६ वाजता उठवले. मी लगेच उठलो. आम्ही दोघांनी सगळ आवरल आणि गच्चीत फोटो काढायला गेलो. तर मला तिकडे खूप पक्षी दिसले. आम्ही दोघे गच्चीत एक तास होतो. मला तिकडे सुगरण पक्षी दिसला. नंतर आम्ही खाली  फिरायला गेलो. ते साडेबारा वाजता परत आलो. घरी आल्यावर मी थोडी विश्रांती घेतली आणि जेवायला बसलो. जेवून झाल्यावर मी आमच्या खोलीत गेलो. आणि आज कोणकोणते पक्षी पहिले त्याच्या नोंदी केल्या. आणि थोडा वेळ झोपलो. नंतर मी परत पक्षी बघायला गेलो. ते एकदम रात्री ७:३० ला घरी गेलो. असाच माझा दिनक्रम होता. 
                               तिसरया दिवशी आम्ही बारा गावाची ग्रामदेवता पाहायला गेलो होतो आणि मोगरा देवतेच्या देवळात गेलो होतो. तिकडन आम्ही बाबांच्या मावशीकडे जेवायला गेलो होतो. जेवून झाल्यावर आम्ही लगेचच घरी गेलो. गेल्यागेल्या मी camera घेऊन फिरायला गेलो. ते रात्री आलो. आणि पंप लावून पाईपाच्याखाली अंघोळ केली. हे पाणी फुकट न जाता झाडांना मिळेल अशी तिथे सोय करून ठेवली आहे.  त्यानंतर आम्ही जेवलो. रात्री १०:०० वाजता गाडीने बाहेर फिरायला गेलो


















. आम्ही खरतर कोणता प्राणी दिसतो का ते पाहायला गेलो होतो. पण त्यावेळी खूप वाहतूक होती. त्यामुळे आम्हाला प्राणी दिसले नाहीत. म्हणून आम्ही घरी आलो आणि झोपलो. 
                                 चौथ्या दिवशी आम्ही तिघेजण सड्यावर तीन बुरुज पहायला गेलो होतो. आम्ही तीन बुरुजाला वळसा घालून आलो. आम्ही प्रथम समुद्राच्या काठावर गेलो. तिथे आम्हाला otters दिसले. वर येताना आम्ही ससा पहिला. थोडे पुढे गेल्यानंतर आम्ही रानकोंबड्यांची एक जोडी पहिली. दुपारी आम्ही दोणीत आंघोळ केली.  दोणी म्हणजे दगडाची पाण्याची टाकी. खूप मज्जा आली. 
आम्ही संध्याकाळी विजयदुर्ग किल्ल्यावर गेलो. वाटेतच आम्हाला टकाचोर (tree pie) दिसला पण त्याचा फोटो मला काढता आला नाही. म्हणून आम्ही आगेकूच केले. आम्हाला गाडीने किल्ल्यावर पोचण्यासाठी पाऊण तास लागला. तिकडे गेल्यावर आम्ही प्रथम मुख्या दरवाजा पहायला गेलो. तिकडून आम्ही समुद्राचे आणि  एकमेकांचे फोटो काढले. आमच्यासोबत माझा दादा सुद्धा होता.  नंतर आम्ही तटबंदीवरून फिरलो. तिथून तर सुंदर असा सागर आम्हाला दिसत होता. आम्ही भुयारी मार्ग पाहिला. त्याच्यातून आम्ही पलीकडे गेलो सुद्धा. तो खूपच छोटा होता. तो किल्ल्यातच संपत होता. आम्ही तटावर चढून पुढे चालायला लागलो. पुढे गेल्यावर तटबंदीचे काम चालू आहे हे दिसल्यावर आम्ही तिकडेच थांबून एकमेकांचे फोटो काढले. तेथे एक माणूस गळ फेकून मासे पकडण्याचा प्रयत्न करीत होत. पण त्याला काही ते जमले नाही. कारण तो गळ फेकला की लगेच तो मागे खेचायचा. तो थोडावेळसुद्धा थांबायचा नाही. आम्ही परत निघालो. कारण काळोख व्हायला आला होता. घरी पोचायला पाऊण तास लागणार होता. आम्ही अर्धाच किल्ला पाहिला. पुढचा आपण परत येऊ तेव्हा बघू असे ठरवले. घरी पोचल्यावर आम्ही भजी खालली आंबे खाल्ले आणि थोडावेळ गप्पा मारून झोपलो. कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच मुंबईला परत जायचे होते.
        पाचव्या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि निघालो. जाताना आम्ही दोन देवळात गेलो. तिथून आम्ही रत्नागीरी येथे माझ्या एका काकाच्या घरी जाऊन आलो. त्यांच्यासोबत आम्ही त्यांनी लावलेली झाडे पाहायला गेलो. रस्त्यावर सर्वांना सावली मिळावी म्हणून त्याने दोन हजार झाडे लावण्याचे ठरवले आहे. तिकडेच एक जुन्या काळची उतरायला पायऱ्या असलेली विहीर पाहिली. पण तेथे आई पडली. म्हणजे तिचा पाय मुरगळला. त्यामुळे तिला खूप दुखत होते. थोड्यावेळाने आम्ही परत त्या काकाच्या घरी गेलो. आम्ही तिकडेच जेवलो. आणि ३ वाजता मुंबईला यायला निघलो. घरी येण्यासाठी रात्रीचा १ वाजला. 
         एकूण मी तिकडे जाऊन फक्त पक्षी पाहिले, आंबे हाणले आणि दोणीत आंघोळ केली. हया पाच दिवसात मला खूप मज्जा करता आली. 
मी पाहिलेल्या पक्षांची यादी पुढे देत आहे.   
तांबट - copersmith
पाणकावळा-little cormonant
खंडया - Large pied kingfisher
छोटा खंडया- common kingfisher  
Indian pitta
राखी धनेश- grey hornbill
साळुंकी-common myna
दयाळ -Indian Robin
घार - brahmani kite
मलबार धनेश-great pied hornbill 
सुतार- Golden backed woodpecker
भारद्वाज crow pheasant 
पोपट - parakit
शिंजीर - sunbird
जांभळा शिंजीर -purple sunbird
leaf bird
हळद्या-Black headed oriole 
Golden oriole
सुभग-iora
टकाचोर -tree pie
तुरेवाला बुलबुल-
White chicked bulbul
होला-spotted dove
 गायबगळा -
पाणबगळा-pond heron
कापशी -black winged kite
green barbet
blue rock thrush
डोमकावळा -
वेडा राघू-green bee eater
रात्रीचर- Night heron
टिटवी -lapwing 
शिपाई बुलबुल- White crested bulbul 
सुगरण -weaver
तारवाली- swift
कोकीळ -koel
श्यामा -
कोतवाल- Indian drongo
रानकोम्बड्या- Red spurfowl
नाचरा -fantail
वटवाघळे- bats
सातभाई -Large grey babbler
खाटिक -Rufous backed shrike
पारवा - blue rock piogen
शेकाट्या- black winged stilt
धोबी -large pied wagtail

मी काढलेले काही फोटो जोडत आहे.

Unmesh Vikas Paranjape

1 comment:

  1. खूप सुंदर फोटो ,उन्मेष तु केलेल्या वर्णाना मुळे आम्हाला पण मज्जा आली भरपूर पक्षी बघण्यास तुला मिळालेले आहेत याचा आम्हाल आनंद झाला

    ReplyDelete