Wednesday, May 1, 2013


राणीची बाग
आम्ही काही आया गेल्या रविवारी राणीच्या बागेत जाऊन आलो. काही झाडांना चांगला बहर आला होता,काही झाडे नव्याने समजली, प्रत्येक आईने मनापासून रस दाखवला. ज्या झाडाभोवती जात होतो तेव्हा आधीच्या आठवणी जागृत झाल्या. मधल्या तळया भोवती जमण्याचे कारण लांबून गुलाबी तुर्याने लक्ष वेधून घेतले बघू या का कोणती फुले आहेत ती ,म्हणून गेलो ती होती ताम्हन त्याच्याच बाजूला  लाल चाफा खूपच फुलाला होता मोह आवरला नाही. फुले वेचण्यात गुंगून गेलो ,घंटेच्या  फुलाची आठवण झाली पण ती फुललेली नव्हती ,नागचाफा, रामधन चंपा फुलून गेलेला पण त्याचे सौंदर्य दुसर्याच दिवशी लता आजीच्या सोसायटी बघण्यास मिळाले ते झाड फुलांनी संपूर्ण फुललेले आहे,राणीची बाग पूर्ण बघून येईस तोपर्यंत घरची आठवण कोणाला आली नाही ,बर्याच आयांना काही कारणाने येण्यास जमले नाही म्हणून मी झाडांची शास्त्रीय नावे लिहून पाठवते तुम्ही ती (wwwwww.flowers of india.com) वर जाऊन शास्त्रीय नावांवर(botanicalBotanical Names) जावे बघावे तुम्हाला फुलांच्या चित्रा सकट संपूर्ण माहिती सापडेल ,प्रत्यक्षात जरूर जाऊन आनंद घ्यावा, जी फुले आम्ही पहिली त्याचीच नावे लिहिली आहेत
1.       Cassia fistula (Amaltas, bahawas)
2.       Cassia Javanica(pink and white showers)
3.       Bottle brush
4.       Mitragyna Parvifolia(kaim)
5.       dillenia indica (chalta,girmar)
6.       gmelina arborea(sewan)
7.       lagerstroemia speciosa(tamhan,jarul,queens flower)
8.       strophanthus boivinii(cork screw flower)
9.       gustavia augusta(majestic heaven lotus, tabala duagg)
10.   sterculia villosa (sardol)
.    

1 comment:

  1. So nice of you, Mokshada. apratyaksha anubhav ghenyasathee tuzi mahitee molachee ahe.

    shubhada

    ReplyDelete