Sunday, October 28, 2012

|| श्री गुरवे नम: ||

कोजागिरी पौर्णिमा
अश्विन महिन्यात कोजागिरी पौर्णिमा येते या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. शरद ऋतू म्हणजे, पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होण्यामधला काळ, दिवसा खूप उष्णता असते रात्री खूप गारवा असतो, या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा (नवनिर्मिती) असे म्हणतात, कारण भाताचे पीक तयार झालेले असते, म्हणून त्याच्या लोंब्यांची पूजा करतात मगच भाताची कापणी करून नवीन तांदुळाचे दाणे खीरीत घालतात.
भौगोलिकदृष्ट्या चंद्र  पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे चंद्राची शीतलता पृथ्वीवासयांना मिळते.
या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर येते प्रत्येक घराचे दार ठोठावते व ती विचारते, को जागर्ति, को जागर्ति याचा अर्थ कोण जागा आहे, तेथच मी स्थिर होणार, म्हणून जागे राहणे आवश्यक आहे

कोजागिरी पोर्णिमा म्हणजेच कौमुदी पौर्णिमा, कौमुदी याचा अर्थ चंद्राची प्रभा
या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे, संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून नारळाचे पाणी व पोह्याचा नेवैद्य दाखवून तो उपवास सोडण्याची पद्धत आहे, त्याचबरोबर मसाला दूध किवा बासुंदीचा प्रसाद असतो,
आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये पित्तप्रकोप वाढतो, त्यासाठी औषध म्हणून थंड दूध पिणे आवश्यक असते, महाराष्ट्र कोजागिरी पौर्णिमेला ज्येष्ठ मुलाला ओवाळण्याची प्रथा आहे, त्यानंतर सगळ्यांनाच ओवाळले जाते. अनेक राज्यात या पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, प्रथा आहेत. आसाममध्ये यालाच कुमार पौर्णिमा असे म्हणतात.
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेछ्या. सर्वांच्या घरी आरोग्य, सुख-शांती लाभो, हीच प्रार्थना,ह्याच्या व्यतिरिक्त कोणालाही कोजागिरीची आणखीन माहिती असल्या किवा तुमच्या कोणत्याही आठवणी असल्यास जरूर लिहावे ,

1 comment:

  1. thanks Mokshada. Recently I had been to CERC, Ahmedabad. It is a big laboratory where all consumer products are tasted. They tased many Antacid tablets and no one was worth a cup of milk. Thy have published their report saying, when you face acidity, drink milk instead of any anacid tablet! we should be rpoud of many such Indian scientists who invented this and inbibed in our culture.
    -shubhada

    ReplyDelete