Monday, October 22, 2012

Hello
परवा आमच्या शाळेत काव्यलेखन स्पर्धा झाली. त्यादिवशी अचानक आम्हाला विषय दिला गेला - निसर्ग. निसर्गातला एक घटक घेउन कविता करायची होती. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. मला कविता करताना फार मजा आली. मला वाटल आपण निसर्गातला एक छोटासा ,पण फार महत्वाचा घटक घेउन कविता केली पाहिजे म्हणून मी दगड हा विषय घेतला. मी केलेली कविता-

किती किती सुंदर हे दगड
त्यांना गोळा करण्याची मला फार आवड

वेगवेगळे दगड वेगवेगळ्या प्रदेशात
त्यांचे मनमोहक रंग भारती मनात

म्हटलं तर दगड म्हणजे निव्वळ कचरा
पण त्यातल्या खनिजांसाठी माणूस किती हावरा

खडक झीजूनच बनते माती
मातीच्या उपयोगाची नाही गणती

दगडांचे आहेत अगणित प्रकार
काही गुळगुळीत तर काही धारदार

दगडांच्या घर्षणानेच बनली आग
तरी का करता दगडांचा एवढा राग राग?

टाल्क आहे सर्वात मऊ खडक
तर हिरा सर्वात कडक

हे दोन्ही खडक आवडती स्त्रियांना
जरा अभ्यासा आसपासच्या दगडांना

दगड गोळा करण्याचा लावा छन्द
त्यांना निरखताना व्हाल धुंद



-मल्लिका

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Dear Mallika We like your poem very much. The way you expressed It is really admirable.

    Aparna.

    ReplyDelete
  3. प्रिय मल्लिका, तुझी कविता खूपच चांगली आहे ,मला मात्र एक कविता आठवली राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हाची महाराष्ट्र देशा ही कविता वसंत बापटांची असावी, असे वाटते, चूक असल्यासे ज्याला माहित असेल त्याने कळवावे

    ReplyDelete