Wednesday, June 19, 2013

पर्यावरणप्रिय गणपती पेठ

सण साजरे करताना पर्यावरणाचे भान ठेवण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे पर्यावरणप्रिय गणपतीउत्सव सजावट  पेठ भरवली जात आहे. गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू झाला आणि लोकप्रिय ठरला. यांत माती/पेपरमेश चे गणपती तसेच सजावटीच्या वस्तू प्रदर्शित केल्या होत्या.  गणपती-गौरी सजवताना थर्माकोल, प्लास्टिक यांचा वापर न करता कापड, कागद इ वापरून सजावट करता येईल, टाकाऊ वस्तूंपासून नव्या सुंदर चीजा सजावटीत वापरता येतील- हा संदेश लोकांना मिळावा आणि तशा दर्जेदार वस्तू त्यांना वाजवी दरांत सहज उपलब्ध व्हाव्यात, हा या पेठेचा हेतू असतो. काही कलाकारानी  अशा वस्तू तयार करून त्या तिथे  विक्रीसाठी ठेवल्या होत्या. गेल्या वर्षी सुधांशू नूलकर, स्वरूपा, स्वाती करंजे, शांतला, विवेक खाच्चे या सर्वांनी मिळून एक दालन घेतले होते. आनंदमेवा शिबिरातील पालकांचे हे दालन खूप छान होते. कलात्मक, कल्पक, co-operative! यंदाही ही संधी आहे. यंदा पर्यावरणप्रिय गणपती पेठ आहे दादर- ब्राह्मण सेवा संघात, ३०-३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी. तीन दिवस. आपल्यातील जे जे पालक अशा कलात्मक सजावटीच्या वस्तू बनवून इथे विक्रीला ठेऊ इच्छितात, त्यानी लवकरांत लवकर विनासंकोच स्वरूपाशी संपर्क करावा.
-शुभदा चौकर 

1 comment:

  1. Sahi Sahi - comment from radha

    --- this opportunity is the best for radha for her creativity. She will be contacting Swaroopa.

    Radha, Sandeep, Vaishali

    ReplyDelete