आपला निसर्ग वेग वेगळ्या प्रण्य्च्या पक्षाच्या मार्गाने आपल्या पर्यंत संदेश पाठवत असतो असाच एक पक्षी नाव आहे "पावशा"पावशा (इंग्रजी: Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo), (शास्त्रीय नाव: Cuculus varius varius), आकाराने साधारण कबुतराएवढा असलेल्या पावशाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे. मान्सूनचा पाऊस येण्या आधी याच्या 'पाऊस आला', 'पाऊस आला' (किंवा 'पेरते व्हा', 'पेरते व्हा') अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळते असे बळीराजा मानतो, शेतीच्या कामाला लागतो. हा पक्षी सामान्यांच्या जवळचा आहे. यावर अनेक भाषांमध्ये लोक-कथा, गीते, म्हणी वगैरे आहेत.
नर-मादी दिसायला सारखेच, राखेच्या रंगाचे, शेपटीवर पट्टे असतात. भारतात सर्वत्र आढळतो, झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो. विणीचा काळ मार्च ते जून असून कोणत्याही 'ककु' सारखे मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते. पुढे यांच्या पिलांना वाढवायची जबाबदारी अशा पालकांची असते.
फारच सुरेख माहिती. एक शंका - पावशा पक्षी स्थलांतरीत पक्षी आहे का?
ReplyDeleteDear Vikas Kaka
ReplyDeleteThis bird is locally migratory.
hairy caterpillars and other insects,berries and wild figs are it's main food.
Thanks Sarvesh. See you soon!!!!!!!
ReplyDelete