Friday, November 2, 2012

चंद्र

Hi
आपण सानियाकडे कोजागिरीच्या रात्री जमलो होतो. तेव्हा मी चंद्र या विषयावरची माझी कविता म्हटली होती. ती ब्लॉगवर टाकावी असे तुम्ही बऱ्याच जणांनी सुचवले.  अनिरुद्ध दादाने पण त्याची कविता टाकली तर ती नीट वाचता येईल.
माझी कविता -
चंद्र




किती शीतल ही चांदरात 
सोज्वळ भाव दाटून येतो मनात

चांदण्यात फिरताना येते किती मजा
शशांकच असतो गाढ रात्रीचा राजा

चंद्राच्या साक्षीने अनुभवले मौलिक क्षण
कॅमेरात साठवलेत मी हे स्मृतीकण

चंद्र जितका लाडका साहित्यिकांचा तितकाच वैज्ञानिकांचा
'ब्लू मून डे' ला तर हा होतो मॉडेल जगाचा

चंद्रामुळे होते भरती ओहोटी
चंद्राचे उपकार कोटी कोटी


एकमेवाद्वितीय उपग्रह लाभलाय पृथ्वीला
कुतूहल त्याचे अखंड मानवाला

Neil Armstrong ची एक खेप
मानवजातीसाठी ठरली मोठी झेप

भारतानेही सोडले चंद्रावर चांद्रयान
वाढली जगात भारताची शान

भारतानेही लावला महत्वाचा शोध
जगाने घेतला त्यातून बोध

लोकसंख्या वाढली आहे पृथ्वीवरची
मदत घेऊया का या उपग्रहाची?

करायची असेल तेथे वस्ती
पाहायला जाऊया का तेथील धरती?
---------------------------------------------------------------------------------------------






No comments:

Post a Comment