Saturday, November 24, 2012

माझा Mallika-E-Kitchen चा सुंदर अनुभव


From Meghana :


मित्रांनो ,
             काही दिवसांपूर्वी आमच्या आयुष्यात एक खूपच आगळी आणि अनपेक्षित सुंदर घटना घडली .
             मी माझ्या नवीन बेकरीच्या कामाबद्धलची माहिती JUST DIAL सेवेत टाकली होती . मला एक दिवस अचानक एक CALL  आला , आणि त्या समोरच्या व्यक्तीने माझ्या कामाबद्धल माहिती घेतली आणि मला त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगितले . तो CALL होता एका मिडिया फर्म मधून ज्यांनी मल्लिका -ए -किचन च्या ऑडिशनसाठी मला बोलावले होते . आम्ही घरी जेव्हा यावर बोललो , तेव्हा थोडी मिडिया बद्दलची  एकूण भीती आणि गैरसमज यावरून ठरत नव्हते कि काय करावे . अखेर जयंत स्वतःत्या व्यक्तीशी बोलले आणि मग मी जायचे ठरवले .
         
            मी आणि वेदांत पुढच्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधे गेलो ,माझ्यापेक्षा वेदांत खूप खूश होता . तिथे गेल्यावर त्यांनी मला सांगितले की ,तुम्हाला इथे एक पदार्थ बनवायचा आहे आणि एकाच वेळेस एक व्यक्ती gas वर बनवणार आणि दुसरी MICROWAVE OVEN मध्ये . मी त्यांना बोलले की gas असेल तर मला चालेल  . ते बोलले कि सगळं चिठ्ठ्या टाकून होतं आणि फक्त एक दिवस आधी तुम्हाला कळेल .मग आम्ही निघालो . तिने माझे रेकॉर्डिंग केले आणि आमच्या फोनची वाट पहा असे सांगितले . पुढच्या दोन  दिवसांत मला कळले की माझी निवड झाली आणि एकूण  ७५० ऑडिशन मध्ये २४  निवडल्या ज्यात महाराष्ट्र आणि बाकीचे ३ मेट्रो शहर होते.
         या नंतरचे सगळे बोलणे मेलवरच होते. मला कळले की मला 'CHILLI GARLIC NOODLES' बनवायचे आहेत आणि माझ्या शोची थीम 'CHILDREN's DAY' असणार. मला मेलवर दोन्ही रेसिपी मिळाल्या, gas आणि microwave oven ची. मी घरी २-३ वेळा बनवून पाहिले आणि प्रार्थना करत होते की gas मिळावा. एक दिवस आधी आम्हाला सगळ्या बायकांना बोलावले आणि आम्ही भेटलो,जेव्हा कळले तेव्हा खूप भीती  वाटली कारण मला त्यांनी gas  दिला नव्हता. पण तो दिवस एवढा छान गेला की मला खूपच छान मैत्रीणी  मिळाल्या ज्यांच्याशी आजही मी फोनवर बोलते आणि एक सुंदर नातं ठेवायचा प्रयत्न करतेय.

            दुसऱ्या दिवशी,माझ्या शोची शूटिंग होती आणि मला ७ ला पोचायचे होते R K Studio मध्ये. मी आई,जयंत,भाऊ सगळ्यांना विचारले माझ्या बरोबर यायला, पण मधला दिवस असल्याने सगळेच कामात होते. शेवट मेहेकने  ठरवले की, मी काही करून येणार,आम्हाला सांगितले होते कि शूटिंग २ पर्यंत संपणार ,पण शो चा अगदी पहिला दिवस असल्याने ,त्यांचे इतके काम शिल्लक होते की शूटिंग संपली ७ ला .
        तो शूटिंगचा अनुभव खूपच निराळा होता ,त्यात एक गोष्ट कळून आली कि जे शूटिंग करत आहेत ,प्रचंड STRESS मधून जात आहेत ,कारण दर वेळेस कुठल्या न कुठल्या कारणाने शॉट कट व्हायचा . आम्ही तर जाम वैतागलो होतो कारण आम्हाला सारखे एकच गोष्ट परत परत बोलायला करायला लागत होती . शेवट आम्हाला अर्धा तास त्यांनी दिला आणि सलग शूटिंग केली . त्यामध्ये चुकलेले SHOTS नंतर परत घेतले तेव्हा आम्हाला परत ACTING करायला लागली ,त्यात गम्मत अशी असायची कि ,समोर सूचना द्यायचे जे तुम्हाला कानात ऐकायला मिळायचे आणि तुम्ही अजिबात न गोंधळता ते करायचे .
         त्या दिवशीचं  आमचं शूटिंग संपलंच  R K STUDIO मधे रात्री १०ला ,कारण त्यांनी फोटो शूट वगैरे साठी थांबिवले होते ,पण नंतर जयंत officeवरून आल्यामुळे मला आणि मेहेकला बरे वाटले .
         एक छान अनुभव आला जेव्हा तो पूर्ण दिवस मेहेकची तिथे सेटवर सगळ्यांनी कंटाळा नाही येणार अशी काळजी घेतली आणि प्रत्येक क्षणात किती मेहनत आणि DEDICATION आहे याचा आम्हाला प्रत्यय आला .


1 comment:

  1. Super Mallika-e-Meghana. Way to go. thanks for sharing the details of your experience. Reminded me of the shoot that was done at our place (which was new and just done up about 3 years ago) for a singer friend who was participating in a music show on TV. I remember telling the person shooting the film "how difficult their job was" Just cannot imagine.

    ReplyDelete