Friday, November 23, 2012

मोदी रिसॉर्टमधील फेरफटका

|| श्री गुरवे नमः ||

दर वर्षी आपण सगळे मोदी रिसॉर्टला भेट देतो. दर वेळेस नवीन काहीतरी बघण्यास मिळते. या वेळेस आम्ही ३-४ जणी सकाळी फिरायला गेलो.
तळ्याच्या काठावर फारच सुंदर दृश्य दिसले. डोंगरावरून धुके खाली सरकत तळ्यात उतरत होते. त्याला एक लय होती. कधी ते विरुद्ध दिशेच्या काठावर आपटून परत फिरत होते, कधी संगीतकार दोन हातांनी संगीत देतात, तसे ते धुके तळ्यातील बदकांना संगीत शिकवत आहेत की काय, असे वाटत होते. बदके आपल्याच तालात खेळत होती. त्यांनी डुबकी मारली की पाण्यावर संथ तरंग उठत होते. काही पक्षी-फुलपाखरे पहिली. बुचाच्या झाडावरील नाजूक फुले वार्र्याबरोबर हिंदोळे घेताना बघून आनंद होत होता. आजी नेहमी म्हणतात ना, निसर्गात संगीत असते! ते मला जाणवले.

No comments:

Post a Comment