टाकाऊपासून कलाकृती
मुंबई ग्राहक पंचायतीच्या ज्या पेठा सध्या चालू आहेत, त्यात स्वरूपाने दादरला व बोरिवलीला टाकाऊपासून कलाकृती बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या. तिने पाण्याच्या बाटल्या, करवंट्या यांपासून बनवलेल्या कलाकृती निव्वळ अप्रतिम. तिचे मनापासून कौतुक. तिची कल्पकता आणि कौशल्य पाहून अभिमान वाटला. सर्वाना तिची कार्यशाळा फार आवडली.
या फक्त कलाकृती नाहीत, तर आपल्याला शाश्वत जीवनशैलीकडे नेणारा विचार आहे. जगभर मांडल्या जाणाऱ्या या व्यापक विचाराचे हे प्रात्यक्षिक आहे. मुंबई ग्राहक पंचायतीला हा विचार ग्राहकांमध्ये रुजवायचा आहे. म्हणून आम्ही या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. स्वरूपाने त्यात मोठे योगदान दिले.
मी अलीकडे लताआजीनी मला दिलेले Ecological Intelligence हे पुस्तक वाचले. Ecological Intelligence वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम फार महत्त्वाचा वाटतो.
-शुभदा चौकर

No comments:
Post a Comment