आजच्या लोकसत्तातील 'आकलन' -- कॉपीबहाद्दर हे सदर अप्रतिम आहे. श्री प्रशांत दीक्षित हे सदर दर मंगळवारी लिहितात. ते नेहमीच फार छान असते.
आजचा विषय तर आपणा सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. शिबिरात आपण नेहमी चर्चा करतो की जीवनात वेगळ्या वाटा धुंडाळल्या पाहिजेत. मात्र वेळ येताच आपल्याला काय हवे, कशात आनंद मिळेल, मुलाना करीअर साठी काय नवीन शोधता येईल असा विचार करण्याचे कष्ट न घेता आपण इतरांचे अनुकरण करतो. सर्व मानवसमाज अशाच चक्रात अडकत आहेत व technology सर्वांना साच्यातून काढल्यासारखे जगायला शिकवत आहे असे या लेखात मांडले आहे. लेख वाचल्यावर आपण अंतर्मुख होतो. आपल्या जीवनशैलीबाबत पुनर्विचार करणे आवश्यक वाटू लागते. शिबिरातील सर्व मुलांनी हा लेख वाचून आपसात व ब्लॉगवर चर्चा करावी इतका तो मला महत्वाचा वाटला. सोबत लेखाची लिंक देत आहे.
http://epaper.loksatta.com/75955/indian-express/18-12-2012#page/7/2
vikas
No comments:
Post a Comment