Friday, September 28, 2012

After a long time



फार दिवसांनी आपली भेट.
कविता
थोड्या दिवसांपूर्वी सानियाची कविता ब्लॉगवर आली. त्याआधी अनिरुद्ध व किरणच्याही कविताही ब्लॉगवर प्रसिद्ध झाल्या. कविता चांगल्या आहेत किंवा नाहीत याबद्दल माझे काही मत नाही  कारण कविता या विषयात मला काही गती नाही. त्यात पुन्हा त्या इंग्रजीत आहेत.
मला फक्त एकच सूचवायचं आहे की ज्यांना कोणाला लेखनात रस आहे त्यांनी त्या भाषेतल्या श्रेष्ठ लेखकांचे लेखन अभ्यास म्हणून वाचणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. हे सर्वच कलांना लागू आहे.

गार्गीचा पोस्ट
आपल्या ब्लॉगवर आत्तापर्यंतच्या पोस्टमधला उत्तम पोस्ट. ब्लॉग हा आपले विचार स्पष्टपणे आपल्या ग्रूपमधे शेअर करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. गार्गीचे विचार स्पष्ट असतातच पण तिने मांडलेही छानपणे. Excellent self-introspection.

ब्लॉगसंबंधी मला वाटत असलेल्या त्रूटी
1.  मुलांचा कमी सहभाग. त्यांना तो कंटाळवाणा / बोअर तर वाटत नाही ना? किंवा त्यांच्याकडे वेळ नाही?
2.   कॉमेंटस् या फारच गोड गोड असतात किंवा नसतातच. एखाद्या विषयासंबंधी विचारांची देवाणघेवाण आपल्या मित्रमंडळींमध्ये करणे हे तर ब्लॉगचे उद्दिष्ट असते. जर ते आपण करणार नसलो तर आपली मैत्री ती काय. उदाहरणार्थ गार्गीच्या पोस्टमधे तिने expression of love आणि self-realisation that she must be a nice person असे दोन मुद्दे मांडले आहेत. त्यावर आपण विचार करून आपलंही मत मांडलं तर ब्लॉग अर्थपूर्ण होऊ शकतो.
3.  ज्या पोस्ट टॉपिकल आहेत उदा. प्रदर्शनाची काळ-वेळ तशा पोस्ट काढणे आवश्यक आहे.
4.  सर्वसाधारण पोस्ट या फॉर्मल भाषेत आहेत. मलातर परीक्षेत निबंध लिहिले आहेत असंच वाटतं. अर्थात इन्फॉर्मल लिहिणं कठिण आहेच.
आत्ता मी जे काही लिहिले आहे ते सर्वांना पटले पाहिजे असं नाही. मतभेद असले तर ते कॉमेंटस् मधे आले पाहिजेत. पण कॉमेंटस आल्याच नाहीत तर कळतंच नाही की आपलं बरोबर की चूक.  आपला मुख्य प्रश्न आहे की मतभेद शांतपणे, विचारपूर्वक कसे मांडायचे ते शिकण्यासाठी ब्लॉगचा आपण उपयोग करू शकतो. कारण बोलण्यापेक्षा लिहिणे अधिक जबाबदारीने केले जाते.

2 comments:

  1. sorry
    मी फारच माोठा टाइप घेतला प्रिंटींगचा व्यवसाय असून.
    सगळ्यांनी वाचावा म्हणून नव्हे. (हे वाक्य मजेत घ्या.)

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete