Sunday, September 9, 2012

आनंदमेवा शिबिरातील आपल्या काही कल्पक, कलाकार मित्रांनी गौरी-गणपती सजावटीसाठी काही सुंदर कलाकृती तयार केल्या आहेत. मुंबई ग्राहक पंचायतीने सोमवार १० व मंगळवार ११ सप्टेंबर रोजी ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर येथे पर्यावरणप्रेमी गौरी-गणपती सजावटीचे एक खास प्रदर्शन भरवले आहे. त्यात सुमारे २० दलाने आहेत. यापैकी एक दालन आपल्या मित्रांचे आहे. स्वरूपा, स्वाती, शांतला, विवेक खात्चे, सुधांशु यांनी मिळून मस्त कलाकृती घडवल्या आहेत. त्या पाहायला, विकत घ्यायला आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जरूर या. वेळ आहे ११ ते ८.
- शुभदा चौकर

No comments:

Post a Comment