Wednesday, September 26, 2012

मुंबई ग्राहक पंचायतीने पर्यावरणप्रेमी गणपती उत्सव स्पर्धा घेतली होती. मी त्या मोहिमेची प्रमुख होते. सुमारे २०० जणांनी भाग घेतला होता. फार छान छान कल्पना पाहायला मिळाल्या. निकाल लावतेवेळी माझ्या हातात सर्व फोटो, मजकूर येईल. तेव्हा मी त्याबद्दल अधिक सांगेन. आपल्या सर्वाना सांगण्यासारखी बाब म्हणजे, परांजपे कुटुंबानेही त्यात भाग घेतला होता. त्यांचा गणपती मस्त होता. धातूची मूर्ती,  उन्मेष, विशाखाने बनवलेल्या ओरिगामी पक्षांची माळ, शांतालाची कागदी फुले, स्वरूपाची रांगोळी, सुक्या मेव्याचा प्रसाद, त्यासाठी ओरीगामीचे सुरेख बॉक्स... अगदी प्रसन्न वाटले. पर्यावरणाचा तर विचार होताच. पण पूर्ण कुटुंब, तसेच शिबिराचे विस्तारीत कुटुंब यांची सामीलकी त्यात दिसली. विशाखा, उन्मेष, विकास सर्वांचे अभिनंदन. 
-शुभदा चौकर

1 comment:

  1. We could so proudly tell at home about efforts taken by Paranjapes in decoration and for the maintaining the eco friendliness in all the aspects.

    ReplyDelete