रविवारी दुपारनंतर थोडा वेळ असल्याने आम्ही कोठेतरी बाहेर फेरफटका मारण्याचे ठरविले.पण कोठे जावे हे काही ठरेना .ईश्वरी मात्र बिल्डींग मधील मैत्रिणींकडे friendship day साजरा करण्यासाठी गेली. प्रश्न उरला आमचा तिघांचा, शेवटी आम्ही तिघांनी खारघर मध्येच ज्या ठिकाणी आपण फिरलो नाही त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले .सर्वेश,अपर्णा आणि मी असे आम्ही तिघे खारघर मधील spaghetti परिसरात गेलो .तेथे आम्हाला रस्त्याच्या बाजूलाच सलग पाच कदंबाची बहरलेली झाडे दिसली,खूप आनंद झाला.मग आम्ही तिघेही त्या झाडांच्या भोवती फिरून त्याला आलेल्या फुलांचे निरीक्षण करू लागलो तेव्हा असे दिसून आले की ती सर्व फुले ज्या देठास आलेली होती त्याच देठाची पाने आगदी त्या फुलाच्या विरुद्ध दिशेस होती जणू काही ते फुल पानांच्या मागे दडले आहे .त्या बहरलेल्या कदंबाचे व त्या वरील फुलांचे फोटो सर्वेशने काढले .रविवारची संध्याकाळ
ईश्वरी सोबत आली नसल्याने तिच्यासाठी सर्वेशने झाडास सांगून एक फुल घेतले .त्या दिवसाची संध्याकाळ आमची त्या कदंबा सोबत कधी संपली तेही समजले नाही .घरी येऊन ते फुल ईश्वरीला देताच तिने क्षणाचाही वेळ न घेता ते फुल कदंबाचे असल्याचे ओळखले आणि खूप आनंदी झाली .आम्हाला खूप आश्चर्य वाटले की तिने
ते फुल ओळखले,तेव्हा ईश्वरीने आमच्या शिबिरातील पहिल्या वर्षाची आठवण सांगितली .त्या वर्षी लाताआजीनी सर्व आई बाबा व मुलांना सायन हॉस्पिटल जवळील बहरलेले कदंबाचे झाड व त्याची फुले दाखवली होती ,ते तिने सांगितले.
शिबिरात असल्यानेच आम्हाला या गोष्टीचा निखळ आनंद घेता आला आणि वेगळ्या तर्हेने रविवारची संध्याकाळ आनंदात घालविता आली.
------गिरीश गोरे ------
Lucky are we parents and luckier our children to enjoy this kind of pleasures in life.
ReplyDeletesundarach,
Delete