Thursday, August 16, 2012

ज्यावेळी लताआजींच्या घरात घडलेल्या घटनेबद्दल समजले तेव्हा आम्हा सर्वाना धक्का बसला. परंतु लताआजी , अनिल आजोबा तसेच अद्वैतचे, गार्गीचे कुटुंब हि सुरक्षित असल्याचे समजल्यावर निवांत वाटले. प्रथम असे कसे काय घडले असावे असाच विचार मनात आला कारण जरी कोणाला शारीरिक इजा झाली नसली तरी घरातल्या  ज्या वस्तूंची हानी झाली असेल त्या वस्तूंशी निगडीत घरातील प्रत्येक सदस्याची काहीतरी आठवणही असतेच हाही विचार आमच्या तिघांच्या मनात आला. कारण लता आजींच्या घरात इतक्या गोष्टी होत्या , अगदी त्यातील काही चित्रे तर लहान मुलांनी  काढलेली होती.
या घतनेमधून एक गोष्ट सर्वांनी शिकली पाहिजे ती म्हणजे आपण आपल्या स्वताच्या घरातील गोष्टींची ज्या रीतीने काळजी घेतो त्याप्रमाणे  आपण इतर कोणाच्याही घरात वावरताना ते आपलेच घर समजून त्याच  भावनेने अधिक सजगतेने ती काळजी घेणे आवश्यक आहे

अजितप्रियांका

No comments:

Post a Comment