प्रिय लता आजी- अनिल आजोबा,
तुमच्या घरी घडलेली घटना आईने मला सांगितली तेव्हा मला खूप वाईट वाटले. तुमच्यासारख्या प्रचंड चांगल्या माणसांच्या बाबतीत असे का व्हावे, याची खंत वाटली. जेव्हा मला कळले की या रविवारी ठरल्याप्रमाणे शिबीर आहे, तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटला की तुम्ही आमच्यावर न रागावता, त्रास सहन करूनही शिबीर रद्द न करता ते ठेवलेतच. खरच तुमची कमाल वाटली.
-मल्लिका चौकर
No comments:
Post a Comment