शनिवारी शिबिरात घडलेली ती अनपेक्षित घटना धक्कादायक तर होतीच पण ती क्लेशकारकसुद्धा होती .
खूप जवळच्या माणसाला जेव्हा काही होतं तेव्हा जो त्रास मनाला होतो तोच तेव्हा जाणवत होता . पण कुठेतरी एक विश्वास होता की आजी-आजोबांना काही होणार नाही .
ओमकार तर मला म्हणाला तू आधी लता आजींना फोन कर . तेव्हा मी त्याला समजावलं की आपले सगळ्यांचेच फोन घेणं त्यांना अधिक त्रासाचं होईल . त्यापेक्षा आपल्याला आजी जे काही सांगतात तेच आपण अधिक प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करूया .
रात्री अभ्यास झाल्यानंतर तो तडक कॉम्पुटरवर बसला आणि त्याने आपले काही फोटो आणि त्यासंबंधित जे लिखाण आहे ते पोस्ट केलं . त्यावेळी मी माझ्या कामात होते. ते लिहून झाल्यानंतर त्याने मला सांगितलं, मी काही फोटो पोस्ट केलेत ते पाहून आजींना जरा बरं वाटेल. ते ऐकून मला या पिढीला घडवण्यासाठी आजी जे कष्ट घेतायत त्याला किती उत्तम फळ आलंय , हे प्रकर्षाने जाणवलं .
सुनिता-विवेक
No comments:
Post a Comment