आदरणीय लता आजी आणि अनिल आजोबा ,शनिवारच्या दुर्घट ने बद्दल अतिशय वाईट वाटलं .माफी मागायची तर आमची योग्यताच नाही ,कारण त्यानं काहीही नुकसान भरून येणार नाही .वाईट याचं वाटत आहे की तुम्ही आमच्या सगळ्यांच्या जीवनात कितीतरी आनंद निर्माण केला ,त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला दु:खच दिलं .
हे तर अगदी "तोमोई " शाळे सारखं झालं .कोबाईशी सरांना त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची शाळा जळताना बघावी लागली ,पण ते तर शत्रुराष्ट्रामुळे पण लता आजींना तर शिबिरातील आमच्यासारख्या बेजबाबदार पालकांमुळे हे सगळे बघावं लागलं .त्याचं आम्हांला खुप वाईट वाटलं .
मुलांना झाल्या प्रकाराबाबत सांगितल्यावर त्यांना पण खुप दु:ख झालं ,''लता आजी व अनिल आजोबा कसे आहेत ?''असं विचारलं .दोघे बरे आहेत सांगितल्यावर thank god असं वाटलं . ईश्वरीने लता आजी साठी एक सुंदर कार्ड बनवलं त्याव र संदेश लिहिला आहे . सर्वेश अर्ध्या रात्री
पर्यंत झोपु शकला नाही .रविवारी मुलांना chocolate खावसं वाटलं नाही.शिबिरामधे ठेवलेल्या वस्तुंची आठवण काढतात .सर्वजन मिळून पुन्हा नवीन बनवूया असं मुलांनी सांगितलं .
यापुढे अधिक जबाबदारीने वागू ,क्षमस्व .
अपर्णा -गिरीश
.
No comments:
Post a Comment