हि दुर्घटना कळल्यावर लताआजी आणि अनिल आजोबांची काळजी तर वाटलीच. पण हतबलता या शब्दाचा अर्थ कळला. अनेक गोष्टी मनात आल्या तरी आता लांबून आपण काहीच करू शकत नाही हि ती भावना. या प्रसंगी दरवाजा न उघडता मदतीची वाट पाहण्याचे जे प्रसंगावधान या दोघांनी दाखवले ते केवळ अफलातून आहे. अशा प्रसंगात भांबावून न जाता आपल्या चीत्तवूत्ती शांत ठेवणे हे केवळ योगी माणसांना जमू शकते. आणि त्याच वेळी अनोळखी माणसे मदतीला आली हा ईश्वरी प्रसाद समजावा. गार्गीने व ज्ञानेशने या प्रसंगाला कसे तोंड दिले असेल याची कल्पना केली तरी पुरे.
आपल्या आप्तांवर असा प्रसंग येणे वाईटच. त्यातून आपल्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या लता आजीवर असा प्रसंग यावा व त्याला आपला हलगर्जीपणा कारण व्हावा हे शल्य फार आहे. तुम्हाला आनंदी करण्याचा एकच मार्ग दिसतो, स्वताला सुधारणे!!!
विकास विशाखा
No comments:
Post a Comment