प्रिय लताआजी व अनिल आजोबा,
आग लागल्याची दुर्घटना कळताच प्रचंड धक्का बसला व असुरक्षित वाटलं पण जेंव्हा तुम्ही दोघे सुरक्षित आहात हे कळताच हायसे व सुरक्षित वाटल. ही आग आमच्या एसी बंद करणे विसरल्यामुळ्ये लागली हे कळ ताच आपण एवढे बेजबाबदार कसे वागू शकतो ह्याबद्दल खंत वाटली. तुम्हाला झालेला त्रास , मनस्ताप व दु:ख याबद्दल क्षमा माग णेही अपराधी वाटतय. हर्षा राहुलला ही बातमी सांगताच धक्का बसला पण आजी आजोबा सुखरूप आहेत हे कळ ताच त्यानी देवाचे आभार मानले.
हर्षाने ह्या घटनेबद्दल एक मेणबत्ती लावून शिबिरातली प्रार्थना म्हणावी असे सुचविले व त्याचे स्पष्टीकरण असे दिले की प्रकाशामुळ्ये नकारात्मक भावना व दुख:रूपी अंध:कार दूर होतो. राहुलची प्रतिक्रिया अशी होती की आजी आजोबा आता आनंदी फक्त तुमच्या चांगल्या वागण्यामुळयेच होऊ शकतात. एकही वेळ अशी येऊ दयायची नाही की त्यांना तुम्हाला समजवाव लागेल, शिबिरातली सगळी गाणी प्रत्येकाला यायला हवीत आणि तरच तुम्ही त्यांना खरया अर्थान आनंद देऊ शकाल.
खरच प्रयत्न करू.
आरती राजीव
No comments:
Post a Comment