Monday, August 13, 2012

प्रिय पालक वा मुलांनो 
एव्हाना  लताआजीकडे झालेल्या दुर्घटनेची आपल्याला कल्पना आली असेलच. देवाच्या कृपेने  आणि लताआजी व अनिल आजोबांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोघेही सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नसली तरी मनाने ते दुखावले आहेत, व्यथित झाले आहेत.
या घटनेची जबाबदारी आपण पालकांनीही स्वीकारली पाहिजे. पण असो. त्याचा उहापोह करण्याची हि वेळ नाही.  आता गरज आहे ती आपण सगळ्यांनी लताआजीच्या संपर्कात राहण्याची. त्यांच्याशी संवाद साधण्याची.
आपल्या सगळ्यांना त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोचाव्यात असे वाटत आहेच. पण त्याचवेळी लताआजींची प्रकृती आणि मनस्वास्थ्य जपणे हेही आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाशी बोलणे त्यांना शक्य नाही. भेट घेणे तर अशक्यच. म्हणूनच आपण सगळ्यांनी या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत.
ह्या दुर्घटनेची बातमी कळताच आपल्या मनात कोणते विचार आले, या घटनेवर आपल्या प्रत्येकाच्या घरात काय चर्चा झाली, विशेषता मुलांची त्यावर काय प्रतिक्रिया होती ते येत्या शनिवारपर्यंत आपण  ब्लॉगवर लिहावे, गार्गी ते सर्व  लताआजींपर्यंत पोचेल असे पाहिलं. मात्र लिहीतना एक पथ्य पाळा. मोजक्या व कमीत कमी शब्दात आपले विचार व्यक्त करा हि विनंती.

-- 
Vikas

No comments:

Post a Comment