Friday, August 17, 2012

रविवारी सकाळी मेसेज आला आणि आम्ही सुन्न जालो. सुरवातीला समजेना काय करावे. नंतर आजी आणि आजोबांची कालजी वाटली. आजीना बरे नाही, त्यांचा त्रास वाढला असेल का? त्यानी दोघानी काय केले असेल? नंतर जाणवले की फ़क्त घरच नहीं तर त्याबरोबर त्या घरातल्या सगळ्या वस्तु, ज्यात कुठे न कुठे सुन्दर आठवणी आहेत त्यांचे काय झाले असेल? किरण दादाना फ़ोन करून चौकशी केली तेव्हा आजींची आणि आजोबांची खुशाली ऐकून थोड़े बरे वाटले.



स्वताचा राग आला की एवढी छोटी गोष्ट पण लक्ष देऊन केली कशी नाही? आपण सगलेच पालक असे बेजबाबदार का बरे वागतो? असेही वाटले की आपण त्या घराला अजून आपल्यात सामावून घेतले नाही म्हणून असे झाले की काय?

स्वानंदी आख्या शिबिर वर रागावली. ती म्हणाली की शिबिर असे करुच कसे शकते? आम्हाला नंतर लक्षात आले की तिच्या दृष्टीने शिबिर ही एक जिवंत गोष्ट आहे आणि शिबिरात सगळे चांगलेच होते. तिला समजवयाला खुप वेळ लागला. आग म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे तिला समजू शकत नाही पण तिला एवढे समजले की काहीतरी वाईट घडले आहे आणि त्याने आजीला त्रास झाला आहे. अनन्या कशी आहे? तिला त्रास जाला का? तिची बाहुली कशी आहे हे तिचे पुढचे प्रश्न होते.

ह्या सगल्यातुन आणि मुख्य म्हणजे रविवारीच्या ठरलेल्या शिबिरातुन एक सन्देश मिळाला की एखादी वाईट आणि अनापेक्षित घटना घडली तरी चांगल्या गोष्टी चालूच ठेवायला हव्या आहेत आणि शिबिर हे एक कुटुंब असेल तर त्याचे हे 'स्पिरिट' आहे. आपण ह्यातून स्वतहाला कसे आणि किती बदलतो आणि काय शिकतो ह्यावर आपला पुढला प्रवास आणि प्रगति ठरेल.


संगीता, विश्वास आणि स्वानंदी

No comments:

Post a Comment