आदरणीय लताआजी आणि अनिलआजोबा,
शनिवारी
झालेल्या दुर्घटनेबद्दल सर्व पालकांतर्फे आम्ही आपली माफी मागतो. त्या दिवशी
झालेल्या प्रकाराबद्दल कळल्यावर आमच्या सर्वांची झोपच उडाली. तुम्ही दोघे सुखरुप
आहात हे कळल्यावर मात्र बरे वाटले. ह्या परिस्थितीत तुम्हाला कश्या प्रकारे मदत
करावी ते मात्र कळत नाही. या आणीबाणीच्या प्रसंगात आम्ही हात पाय गाळून, गांगरून व
घाबरून गेलो असतो. परंतु, तुम्ही सर्वांनी शांत राहून घेतलेले निर्णय आणि दाखवलेले
प्रसंगावधान ह्यातून आम्हाला बरेच शिकण्यासारखे आहे.
तुम्ही दोघे ह्या धक्यातून लवकरच सावराल
अशी देवाकडे प्रार्थना करतो.
गायत्री – प्रसाद
No comments:
Post a Comment