Thursday, August 16, 2012

                       प्रिय  लताआजी  आणि अनिल आजोबा ,
                     रविवारी सकाळी sms  आला  आणि धक्काच बसला . आग लागली  कळल्यावर तुम्ही कसे आहात हे कळेपर्यंत  काहीच सुचत नव्हत . तुम्ही सुखरूप आहात हे समजल्यावर देवाचे आभार मानले .तुम्ही दोघंच घरी आहात हे माहीत असूनही योग्य ती काळजी घेतली गेली नाही . आमच्या बेजबाबदार वागण्यामुळे तुमच्यावर हा प्रसंग ओढवला . याबद्दल अपराधी वाटतंय .रोज नव्या चुका करणारे आम्ही पालक माफीला पात्र नाही आहोत .
                      मुलींना जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा "आजी आजोबा  कसे आहेत? "हे विचारलं .बरे आहेत सांगितल्यावर "  असं  कसं  झालं  ?   का झालं ?" तेव्हा त्यांच्याजवळ आमची चूक कबूल केली . वैष्णवी  म्हणाली  आजींना आता किती वाईट वाटत असेल ?तर शिवानी  म्हणाली माझ्याकडे शिबिरातल्या खूप चांगल्या आठवणी आहेत तशाच सगळ्या मुलांच्यापण असतील  सगळयांना आता फार वाईट वाटेल .नंतर त्या दोघी शिबिरातल्या सुंदर वस्तूंच्या आठवणी काढत बसल्या .
               आनंदमेवा शिबिराच्या ज्या वास्तूने आम्हा सर्वांना आयुष्यभर पुरेल एवढा आनंद दिला ,प्रेम दिलं त्या सुंदर जागेचं आमच्या बेपर्वा वृत्तीमुळे नुकसान झालंय .शनिवारीच तुम्ही प्रत्येक वस्तूबरोबर अनन्या कशी सगळ्यांच्या आठवणी काढते ते सांगत होतात .तिला आता काय वाटेल?तुम्ही नेहमी सर्वांच्या सुरक्षिततेची एवढी काळजी घेत असता आणि आमच्या हातून एवढी मोठी चूक झाली.
              सर्व काटदरे  व  लाड  कुटुंबियांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल क्षमस्व !

                                                  प्राची    व      नंदकिशोर   पाटील 

No comments:

Post a Comment