लता आजी व अनिल आजोबा,
आपल्या शिबिरात घडलेल्या घटनेबद्दल कळल्यावर मन अतिशय सुन्न झाले व तो पूर्ण दिवस बैचैन अवस्थेत गेला. पण तुम्ही दोघे सुखरूप असल्याचे कळल्यावर देवाला नमस्कार केला. आम्हा सर्वान कडून किती बेजवाबदारपणा झाला या बद्दल स्वतःची लाज वाटली.
तुम्ही दोघे आम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करता व त्या बदल्यात आमच्याकडून फक्त योग्य व जबाबदारपणे वागण्याची अपे क्षा करता,पण आम्ही तिथेच अपात्र ठरलो व तुम्हा दोघांच्या मनाला दुखावले आहे ह्या विचाराने दुख होते.या पुढे तुम्हा दोघांचे मन दुखावेल असे न वागण्याचा प्रयत्न करू.
उन्नत ला कळल्यावर त्याने सर्वा त आधी तुम्ही दोघे कसे आहात हे विचारले.पण तुम्ही सुखरूप असल्याचे सांगितल्यावर त्याचा चेहेरयावरची काळजी दूर झाली.
अद्वैत-अनिता, गार्गी-ज्ञानेश, ओम व अनन्या आम्हाला क्षमा करा असे कोणत्या तोंडाने म्हणू?
कारण तुम्ही नसताना व आजी-आजोबा नुकतेच आजारातून उठलेले असताना त्यांना ज्या प्रेमाची व काळजीची गरज होती ती आम्ही घेऊ शकलो नाही त्याबद्दल शतशा क्षमस्व.
दिली प,अर्चना,उन्नत.
No comments:
Post a Comment