अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मला खूपच दु:ख झाले. मला पहिल्यांदी एक प्रश्न पडला होता.तो असा कि ' ac ला आग लागलीच कशी ? आणि ती कशामुळे लागली असावी? ' या दोन प्रश्नांची मी उत्तर शोधून काढली. आणि त्याच्यातून असे लक्षात आले कि ' ac हा रात्रभर चालू राहिला आणि खिडक्या उघड्या राहिल्या. यात कोणाची ना कोणाची तरी चूक आहेच. या आगीत खूप लहानलहान तसेच मोठ्या मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टी सुद्धा जळल्या. त्यामुळे आपल्या शिबिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. तसेच एवढ्यामोठ्या संकटातून सुद्धा लताआजींनी व अनिल आजोबांनी स्वतःची सुटका करून घेतली. यात त्यांचे प्रसंगावधान दिसते.
मी लता आजींना हिरव्या चाफ्याची फुले देईन आणि ओरीगामिमधील कुसुडामा हे फुल करून देणार आहे.
उन्मेष परांजपे .
उन्मेष परांजपे .
No comments:
Post a Comment