Friday, August 17, 2012

प्रिय लता आजी आणि अनिल आजोबा,
अलीकडेच आमच्या दापोलीच्या घरी चोरी झाली. बरेच नुकसान झाले. आम्ही तो धक्का पेलून, त्या दुखातून सावरत असतानाच ही भयंकर बातमी कळली. फार दु:ख वाटले आणि हतबलही. तुमच्या दोघांचे प्रसंगावधान, धीर आणि क्षमाशीलता अशा गुणविशेषांपैकी आम्ही किती गुण कसे घेऊ शकू, असा विचार मनात आला. आपण एकंदरीत काळजी घेण्यात कसे, किती कमी पडतो, आपल्यात काटेकोरपणा येण्यासाठी आपल्या सवयी कशा असाव्यात, जेणेकरून मुलांच्याही मनात शिस्त आणि जबाबदारीची भावना भिनेल, यावर आम्ही तिघांनी चर्चा केली. सोयी-सुविधा जितक्या सहजतेने आपण वापरतो, तितक्याच त्या काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात, याबद्दलची जागरूकता कशी वाढवता येईल, याबद्दल आम्ही बोललो. तुम्ही तुमचा त्रास, मनस्ताप, त्रागा कसा गिळला,पचवला असेल, याची कल्पनाही करवत नाही. आम्हाला घेण्यासारखे कितीतरी धडे आहेत. पण ते धडे आम्ही घ्यावेत, यासाठी इतके क्रूर कृत्य घडायची वाट पहावी लागली, याची फारच खंत आणि लाज वाटते.

-शुभदा, निखिल चौकर 

No comments:

Post a Comment