Saturday, August 18, 2012


लता आजी आणि अनिल आजोबांच्या घरातील घडलेल्या प्रसंगावरून पहिले जाणवले, ते त्यांना काही शारीरिक इजा झाली नाही, ही परमेश्वराचीच कृपा. त्या साठी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

      आपल्या चुकांपाई त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झाला, याला आपणच जबाबदार आहोत, असे वाटले. आजी व आजोबांनी, ज्या विश्वासाने आपले घर, आपला वेळ व वस्तू, आपल्या साठी उपलब्ध करून दिल्या, त्या विश्वासाने आपण आपले मानले नाही. त्याबद्दल आम्ही त्यांची क्षमा मागतो.

      त्या घरातील वस्तूमध्ये मुलांच्या आठवणी होत्या. त्या पूर्णपणे खराब झाल्या. म्हणून वाईट वाटले. परवा श्रावणातील हसरा नाचरा गाणे ऐकल्यावर टेबलावरचा टेपरेकॉर्डर खराब झाला असेल, याची जाणीव झाली. हे सर्व नीट होण्यास वेळ लागेल. अशी चूक परत होता कामा नये, अशी आम्ही काळजी घेऊ. आम्हाला सद्बुद्धी दे.

नूलकर परिवार.

No comments:

Post a Comment