Thursday, May 17, 2012

दोन चूका  एक 8-10 वर्षांपूर्वीची, दूसरी गेल्या महिन्यातली
 
1.                शिबीरातील पहिलं वर्ष असावं. लता आजींनी मला शिबीराच्या दिवसाच्या बऱयाच आधी कागद आणायला सांगितले होते. मी लगेच कागद आणले नाहीत. गुरुवारी वा शुक्रवारी माणसाला पाठविलं पण प्रचंड पाऊस असल्यामुळे ते काही झालं नाही. लताआजींचा फोन शुक्रवारी आला व कागद आणलेले नसल्यामुळे त्या म्हणाल्या मी ते करते आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. तरीही शिबीराच्या वेळी मला आपलं काही यांत फार चूकलं असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी प्रेमाने माझी चूक दाखवली. दोन धडे यातून कळले एक म्हणजे आपल्याला सोपविलेले काम लगेच करणे आणि चूक दुसऱयाला कशा भाषेत आणि टोनमधे सांगणे. आठ-दहा वर्षांत पहिला धडा बऱयापैकी शिकलो पण दूसऱया बाबतीत शिशूवर्गातच आहे.
2.               गेल्या महिन्यात गोरे यांनी घरी बोलावले होते. थोडाफार कार्यक्रमही कळला होता. एकंदर कार्यक्रम नीट आखलेला आहे हे कळले. आदल्या दिवशी निरोप आला की नुलकरांनी आपले नवीन घरही बघायला प्रेमाने बोलावले आहे व त्यासाठी त्यांनी गोऱयांना विचारलेही आहे. त्यासाठी 3च्या ऐवजी 2.30ला पोचायचे. आमच्या घरी यावर चर्चा झाली. ही गोष्ट बरोबर नाही हे सगळ्यांना वाटले. आम्ही गोऱयांना फक्त कळवलं की आम्ही 3.00 वाजता येऊ. तसेच गेल्यावर कळलं की खारघरमधे फिरायला योजलेली ठिकाणही फार जवळ नाहीत. एकूण नूलकरांचे घर बघण्याचा कार्यक्रम नसता तरी ठरवलेले सर्व कार्यक्रम होणे शक्य नव्हते. यासर्वामधे माझी चूक अशी की असं करू नका असं गोऱयांनाही सांगितलं नाही वा नूलकरांना.
3.               नूलकरांना सांगायलाच हवे होते कारण नूलकरांशी आता बऱयाच वर्षांचा परिचय आहे. परिचय मैत्रीत रुपांतर झाले आहे का याबद्दल साशंकता मनात वाटते. नूलकर हे केवळ उदाहरण झाले. पण हे साधारणतः सगळ्यांबाबतीतच वाटते. एका बाजूला आपल्याला आलेल्या कुठल्याही अडचणीला शिबीरातील सगळेजण मदत करतील याचा विश्वास वाटतो. पण आपली अडचण सांगण्यात संकोच वाटतो तसेच चूका सांगून समोरचा दुखावला तर जाणार नाही याची शंका असते. दोन्हीमुळे सगळ्यांबरोबर संबंध चांगले पण मैत्री नाही असं काहीतरी विचित्र झालेले आहे.

No comments:

Post a Comment