मित्रांनो,
ही कविता वाचून सगळ्या माझ्या आणि मुलांच्या लहानपणी च्या आठवणी अगदी ताज्या झाल्या।
आम्ही जेव्हा त्या कवितेबद्दल बोललो तेव्हा सगळ्या केलेल्या मजा आणि नविन शिकलेल्या गोष्टी आठवत होत्या।
वेदांत लिहायला उत्सुक आहे म्हणून मी या मुलांची आठवण नाही तर माझ्या लहानपणी ची आठवण सांगते।
आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरी ग्लोब नव्हता पण आमच्या शाळेत आमचे भुगोलाचे सर ग्लोब शिवाय वर्गात यायचे नाहीत। पण नेहमी आमचा खेळ असायचा तो म्हणजे भारत शोधायचा। आमचे सर आमचा एक खेळ घ्यायचे ज्यात ते दोन ग्रुप बनवायचे आणि प्रत्येक ग्रुप ला ग्लोब बघून एक प्लेस ठरवायची आणि प्लेसबद्दल ची माहीती ( कॉन्टिनेंट, शेजारचा देश इति) असे क्लू द्यायचे आणि दूसरा ग्रुप तो देश २ मिनिट मधे ग्लोब वर शोधायचा। मग आमचा ग्रुप लीडर ते पॉइंट्स वर्षाच्या शेवटी पर्यंत ठेवायचा आणि वार्षिक परिक्षे आधी आम्ही कोण जिंकले ते पहायचो।
पुढे जेव्हा ते सर नसायचे तेव्हा ही आम्ही तो खेळ ग्लोब नसतानाही आटालास वापरून चालू ठेवला।
मी जेव्हा पहिल्यांदा ग्लोब आणला होता तेव्हा मुले शाळेत होती आणि मी दोघाना हा खेळ शिकवला आणि नियमित पणे आम्ही तो खेळ चालू ठेवला आणि मुलांची तर शाळेतपण अटलास ने, आणि घरी आल्यावर ग्लोब घेउन खुप मजा करायचे आणि म्हणुनच दोघानाही भूगोल अणि इतिहास ह्या विषयाचा अभ्यास फार सोपा आणि मजेशीर वाटतो।
मेघना.
मेघनाच्या personality वरून वाटलं नव्हतं की मराठी माध्यमातून तिच शिक्षण् झाले असेल पण ब्लॉगमुळे कळलं. भाषा ही किती महत्त्वाची आहे हे अशामुळे कळतं.
ReplyDelete