लताआजींकडच्या शिबिरातील आम्ही काही मुले व त्याचे आईबाबा अशा १२ जणांनी दि ११. १२. १३ मे असे ३ दिवस सहलीला जायचे ठरवले. दि ११ रोजी शुक्रवारी पहाटे निघायचे आणि दुपारपर्यंत फणसाडला पोचायचे असा बेत आम्ही आखला. फणसाडला जाण्यासाठी थांबत थांबत गेले तरीही ५ तासात प्रवास होतोच. घरून निघतानाच दुर्बीण व क्यामेरा आणण्यास हरकत नाही . फोटो काढताना Flash टाकायचा नाही, अशी सूचना आम्हाला सुधान्शुकाकाने केली. ही जागा समुद्रसपाटीपासून थोडी वर म्हणजेच टेकडीवर आहे.
फणसाड हे एक अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान (national पार्क) नाही.येथे अनेक प्राणी दिसतात. उदा. १) फुलपाखरे
२) येथे साप अनेक आहेत हरणटोळ, चापडा , तस्कर , घोणस इ. ३) गिधाड 4) देवागांदुळ 5)शेकरू ५)बिबट्या ६)अनेक जातीची हरणे 7) आणि दुर्मिळ असा प्राणी म्हणजे शेकरू . शेकरू हा मांजरीसारखा दिसतो. शेकरूची शेपटी मांजरीपेक्षा दुप्पट असते. तिला इंग्लिशमध्ये ( flying squirrel ) असे संबोधतात.
येथे पाचसहाच बिबटे आहेत. या जंगलातील अधिकार्यांनी गिधाडचे nesting पाहीले. दलदलीच्या भागात देवगांदुळ सापडते. देवगांदुळ हा एका हाता एवडा असते
ह्यातील एकही प्राणी दिसला नाही तरी मला चालेल. कारण प्राणी दिसले नाहीत तरी सापाची कात, बिबट्याच्या पावलाचा ठसा। सालीन्दाराचे काटे दिसू शकतात. रात्रीच्या वेळी मचानावरती बसायचे असाही बेत आहे. ज्यांना कोणाला मचानावरती बसायचे आहे त्यांनीच यायचे. बाकीच्यांनी तम्बुतच झोपायचे असे ठरले. ही सगळी माहिती कळल्यावर मला तर कधी एकदाचा फणसाडला जातोय असे झाले आहे .मला रात्री जेवायला मिळाले नाही तरी सुद्धा चालेल . कारण जंगल हेच माझे जेवण आहे असे समजीन.
उन्मेष विकास परांजपे ,
विले पार्ले (पु ) मुंबई - 400057
फोन- 26148748 ,9223300948
Khoop khoop majja karoon ya. Aalyavar photo baghayala avadatil.
ReplyDeleteI wish me & Saniya could join you. we would have liked to show you Janjira Fort. My father has written a tourist guide book about it. If you are planning to visit Janjira, do take it along.
ReplyDeleteParanjape na jevata machanavar basnar?
ReplyDeleteShrikhand, aamras-puri khaunach machanavar basa.
Happy Journey.
Nivadak photo chequebook var taka mhanaje sagalyana kalel ki tumhi Phansadla gela hota.
sanjay
What great fun... do share pics... wish we could have joined you people too....
ReplyDelete