प्रिय सर्व ,
मागच्या आठवडयात मेघनाने सर्व आया आणि मुलांसाठी म्हणून बेकरीचे काही पदार्थ शिकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमासाठी तिने खूप कष्ट घेऊन पूर्वतयारी आणि नियोजन केले असणार . त्यादृष्टीने कोण कोण येणार हे तिला वेळेवर कळणं आवश्यक होते .
तिच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहाव अशी माझी मनापासून इच्छा होती. पण काही कारणामुळे ते जमणार नव्हत .
मी ते ताबडतोब एस.एम .एस . पाठवून तिला कळवण आवश्यक होत पण माझी द्विधा मनस्थिती झाली होती . कळवू , कळवू म्हणता म्हणता तो दिवस येऊन ठेपला तरी माझ्याकडून ते कळवणं झाल नाही आणि अचानक त्या दिवशी ओमकारचे बाबा घरी असल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ नाही पण आयांसाठी असलेल्या 11 ते 3 या वेळेत जाण मला जमेल अस वाटल आणि मी 10:30 तिला फोन केला आणि तिचा पत्ता एस .एम .एस करशील का म्हणून विचारल .नंतर माझ्या मनात आल मी मरोळला वेळेत नाही पोहोचू शकणार मग तिला एस .एम .एस करण्याचा त्रास तरी कशाला देऊ , म्हणून मी पुन्हा तिला फोन करून मला यायला जमणार नसल्याच कळवल . पण या सगळ्या घोळात तिच्या घाईच्या आणि कामाच्या वेळेत तिला खूप त्रास आपल्यामुळे झाला असेल याची
मला कल्पना आली आणि मलाच माझी लाज वाटली .
पण अशी चूक मी पुन्हा होऊ देणार नाही अशी स्वतःशीच खूणगाठ बांधली .
" MEGHANA , I AM REALLY SORRY !"
No comments:
Post a Comment