प्रिय सर्व पालक,
पालकांनी आयोजित करायच्या कार्यक्रमासंबंधी सुरु असलेली चर्चा आपल्या कानावर आली असेलच. येत्या वर्षात हे कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत. लताआजीनीही यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे,
पालकांनी आयोजित करायच्या कार्यक्रमासंबंधी सुरु असलेली चर्चा आपल्या कानावर आली असेलच. येत्या वर्षात हे कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत. लताआजीनीही यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे,
१) कार्यक्रम मुलांसाठी न करता आपल्यासाठी करायचे आहेत. नियोजन करतांना आपला विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणे महत्वाचे आहे.
२) माहितीपर कार्यक्रम करण्यापेक्षा सिंहावलोकन करायचे, आपल्या झालेल्या चुका कशा सुधारायच्या हे पहायचे आणि जेणेकरून या मुलांच्या उत्तम वाढीसाठी पोषक असा समाज म्हणून एकत्रित कसे वागता येईल हे पहायचे हा अशा कार्यक्रमांचा हेतू असावा.
३) एकमेनाकाशी संपर्क ठेवण्यासाठी व ते वाढवण्यासाठी आपला ब्लॉग हेच व्यासपीठ म्हणून वारंवार उपयोगात आणावे.
४) आज सकाळी , लताआजींशी या विषयी मी बोलत असताना, त्यांनी असे सुचवले की १७ जून रोजी आपण सामाजिक पालकत्व या विषयी एक कार्यक्रम करावा. संदर्भ : आनंदयात्रा संगोपनाची - पान क्र १४६ ते १५६.
गेल्या काही दिवसात झालेल्या काही घटनांमुळे त्या व्यथित आहेत.
आपण पालक म्हणून चांगले वाढलो असलो तरी आपले सामाजिक पालकत्व अजूनही खूपच सुधारणे बाकी आहे. आपल्या पैकी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून या संदर्भात आपल्या झालेल्या चुका शोधाव्यात त्यावर ब्लोगवर व आपण भेटू तेव्हा मोकळेपणे चर्चा करावी.
मी माझ्या हातून झालेल्या चुकांचा विचार केला तेव्हा लक्षात आले कि एकदा २५ डिसें या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन लताआजीनी केले होते. पण त्या दिवशी दाखवायच्या फिल्मची तांत्रिक व्यवस्था करताना मी व महेशच्या हातून ढिसाळपणा झाला. परिणामी फिल्म उशिरा सुरु झाली, मुले मोठ्या अपेक्षेने आली होती पण त्यांना पूर्ण फिल्म बघता आली नाही. ते सर्व मुलांसाठी किती महत्वाचे होते
हे नंतर लक्षात आले. पण आता पश्चात्ताप करून काही फायदा नाही. आमचा आळस आणि गलथानपणा आम्हाला नक्कीच टाळता आला असता एवडे मात्र खरे. असो.
मला वाटते की आपल्या हातून सुद्धा कधी ना कधीं अशा चुका झाल्या असण्याचा संभव आहे. त्या आपण आठवून पहा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावर आपण मोकळेपणे चर्चा करू. त्यातूनच शिकून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे.
मला खात्री आहे झालेल्या चुकांतून शिकत आपण सर्व या वर्षात अधिक चांगली प्रगती करू.
मिलिंद चिटणीस
No comments:
Post a Comment