दि.29 एप्रिल ला आम्ही शिबिरातील काही मोठ्या मुलाना त्यांच्या पालकां सोबत बोलावले होते . उद्देश असा होता कि मैत्री अधिक वाढावी. कार्यक्रमाची आखणी अशी होती -----
बायोकल्चर वापरून कचऱ्यात रोप लावणे,शब्दांचे खेळ खेळणे,डोंगराच्या पठारावर जावुन पक्षी ,झाडे ,परिसर बघणे .मुद्रा बागेत जाणे.त्यानंतर घरी येवून जेवण करुन निघणे .
त्या दिवशी मुलांना कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची हे शिकवले .डोंगराच्या पठारावर मुलांनी जंगली झाडे ,बुलबुल पक्षी ,उंचावरून दिसणारे खारघर शहर पाहिले .मुद्रा बागेत भारतीय नृत्यांच्या काही मुद्रा पाहिल्या.ओंकारने काढलेले फुलपाखरांचे फोटो मोठ्या स्क्रीन वरती पाहिले .सर्वेशनी बनवलेला आर्ट रोबोट त्याने मुलानाचालवुन दाखविला.या मध्ये आम्हा सर्वांना खूप आनंद मिळाला.
असा कार्यक्रम करण्याची आमची ही पहिलीचवेळ होती .सर्वजण एवढ्या लांबून आले छान वाटले.
हे प्रत्यक्षात करताना कोणती गोष्ट कोणत्या वेळेत करावी याचे नियोजन करता आले नाही .येणाऱ्या पालकां सोबत कोणती गोष्ट केंव्हा करणार या बाबत चर्चा करायला हवी होती.मुलां सोबत अधिक छान गप्पा करता आल्या असत्या .
.......गिरीश गोरे .....
No comments:
Post a Comment