Thursday, May 31, 2012

जंजिरा भेट


 फणसाडनंतर आम्ही जंजिराला दुपारी गेलो होतो. जंजिरा हा किल्ला खूप वर्ष आधी सिद्धीने बांधला होता.जंजिरावर जाताना आम्ही शिडाच्या बोटीने गेलो होतो. जाताना खूप वेळ लागला. बोतीतन जाताना बोट खूप हलत होती. त्यामुळे आई फार घाबरली होती. जसजशी ती बोट हलत होती. तसतशी आईला चक्कर येत होती. नंतर  आम्ही बोतीतन उतरलो. आम्हाला परत यायला पाऊन ते एक तास दिलेला होता.आमच्या सोबत एक गार्डदेखील होता. त्यांनी आम्हाला दोन गोड पाण्याचे तलाव दाखवले. पण ते आत्ता पिण्याच्या लायकीचे काय तर कश्याच्याच लायकीचे उरलेले नाही. त्या किल्ल्यावर ५३० सैनिकांना राहण्यासाठी जागा होती. तसेच आंम्हाला त्या काळच्या   १ मोठी , २ मध्यम , ३ सर्वात लहान अश्या तीन तोफा पाहील्या. त्यांचे मी एक -एक फोटो काढले आणि पुढे गेलो. तर तिकडे ३ मोठे तलाव होते तसेच तेथे दोन चोरवाटा पाहील्या. आणि आम्ही परत आलो.  मग आम्ही प्रवेशद्वार पहिले.हे दार फक्त राजा किवा त्याचं खास सरदारांसाठीच उघडायचे . जाताना पाउण तास लागला. पण येताना ५ ते १० मिनिटांत आलो. 
                         नंतर आम्ही परत मुंबईला जाण्यासाठी निघालो. येताना आम्हाला पोलिसांनी अडवले. ड्रायव्हरने येताना जी गोष्ट घ्यायला पाहिजे होती ती गोष्ट ड्रायव्हरने घेतलीच नव्हती. एवढे असूनही ड्रायव्हर पोलिसांना उलटून बोलत होता. नंतर पोलिसांनीच त्याच्या कानफटात दिली. आम्हाला जास्ती फाईन भरावा लागला. मग आम्ही निघालो. तोपर्यत पाऊन तास गेलेला होता. आम्ही न थांबता वडखळ नाक्याला पोचलो. आम्ही तेथे जेवलो. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही शेवटी रात्री १२ वाजता घरी पोचलो. 
उन्मेष परांजपे

No comments:

Post a Comment